पालखा ते असली रस्त्याचे निष्कृष्ट काम बिरसा फायटर्सने बंद पाडले* *ठेकेदाराच्या घशात रस्ता, टिकाऊ काम करण्याची मागणी*




*पालखा ते असली रस्त्याचे निष्कृष्ट काम बिरसा फायटर्सने बंद पाडले*

*ठेकेदाराच्या घशात रस्ता, टिकाऊ काम करण्याची मागणी*


धडगांव प्रतिनिधी:  तालुक्यातील पालखा ते असली  खड्डेमय रस्त्याचे  निष्कृष्ट काम तात्काळ थांबवून टिकाऊ चांगल्या दर्जाचे  खडीकरण व डांबरीकरण काम करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार धडगांव व अभियंता बांधकाम विभाग धडगांव यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,धडगांव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी,सचिव मुकेश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    नंदूरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच बाईट आहे. अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात. खड्‌ड्‌यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो. जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत. पालखा  ते असली  रस्ता पूर्ण पणे उखडला आहे.जिकडेतिकडे खड्डेमय झाला आहे. रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे.यापूर्वीही  निष्कृष्ट काम केल्यामुळेच रस्ता पावसाच्या पाण्याने उखडून गेला आहे. या रस्त्याच्या कामासाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.ब-याच वर्षांनी हा रस्ता दुरूस्त केला जात आहे. या रस्त्याचे निष्कृष्ट दर्जाचे काम सुरू आहे.खडी ऐवजी माती, दगड ,गोटे ठेकेदार रस्त्याच्या कामासाठी वापरत आहे. डांबरसुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काटकसरीने वापरत आहे.१ महिनाही रस्ता टिकणार नाही,असे निष्कृष्ट दर्जाचे काम संबंधित  ठेकेदार श्री.राहूल पटेल हे के. के .पाटील  कन्स्ट्रक्शन मार्फत करीत आहे.
या कामात ठेकेदार ओबडधोबड काम करून प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे.या रस्त्याचे काम बिरसा फायटर्सने बंद पाडले आहे. पालखा ते असली रस्त्याचे सुरू असलेले निष्कृष्ट काम तात्काळ थांबवून चिकाऊ चांगले काम करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारास लेखी स्वरूपात देण्यात यावेत. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने