आरोग्यदूत आमदार राजेश दादा पाडवी व राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष न्याय विधी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसावद येथे भव्य आरोग्य शिबिर




आरोग्यदूत आमदार राजेश दादा पाडवी  व राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष न्याय विधी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  म्हसावद येथे भव्य आरोग्य शिबिराला 3900 अधिक रुग्णांची तपासणी.. 

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष मा. उपमुख्यमंत्री (गृह/विधी व न्याय) यांचे कार्यालय, मुंबई व आरोग्यदूत आमदार राजेश दादा पाडवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले या प्रसंगी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस आजार असेल आणि त्यावर उपचाराची आवश्यकता असेल तर शहरातील नामांकित रुग्णालयात विनामूल्य करण्याचे ध्यास मी घेतला आहे असे शहादा - तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी भाकीत केले.

 तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिकांना या विनामूल्य आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात मुंबई, शहादा व तळोदा शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात तपासणी पार पडली...

या शिबिराला नेत्ररोग बालरोग दंत, मूक बधिर, नाक कान घसा, त्वचारोग, जनरल मेडिसिन, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, रक्त तपासणी, डोळे तपासणी अशा विविध आजारांची तपासणी करून निदान करण्यात आले.

यावेळी राज्यस्तरीय मदत पक्षाचे स्टेट कॉर्डिनेटर डॉक्टर रितेश पाटील डॉक्टर योगेश सरताळे यांचे विशेष सहकार्य लाभले. 


यावेळी प्राचार्य मकरंद पाटील साहेब, अंबालाल पाटील, नितीन पाटील, विनोद जैन, डॉ किशोर पाटील, रमाशंकर माळी,सुनील चव्हाण,डॉ विजय चौधरी,मोहन आवासे,नवनाथ वाघ,दिपक ठाकरे,विवेक पाडवी,मनोज पाटील, सत्तार ठाकरे,सचिन पावरा,विजय वाघ,हिरालाल पाटील,दिनेश मराठे,सुभाष वाघ,कमलेश जागिड,बालुभाई पाटील,वैभव सोनार,गुड्डु वळवी,कमल पावरा,स्वप्निल पावरा व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने