*सचिनदादा सोनवणे यांची धुळे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे
युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड**
दोंडाईचा- (अख्तर शाह)
दोंडाईचा शहरातील युवा नेतृत्व मा सचिनदादा सोनवणे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबई कार्यालयात पक्ष प्रवेश केला माजी मेत्री मा. आमदार जयकुमारभाऊ रावल यांनी सचिनदादा सोनवणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्तिचे पत्र दिले. त्यानुसार भारतीय जनता युवामोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुरजमाऊ देसले यांनी सचिनदादा सोनवणे सांना नियुक्तिपत्र दिले मा.आ. जयकुमारभाऊ रावल यानी सचिनदादा सोनवणे यांचा युवकोशी असलेला मोठा संपर्क लक्षात घेता त्यांची नियुक्ति केली असल्याचे बोलले जात आहे त्यांना मा .जयकुमार भाऊ रावल, जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या.
