शहादा शहरात नागरिकांना सुविधांच्या अभाव, नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सुमित गिरासे,प्रतिनिधी शहादा




शहादा शहरात नागरिकांना सुविधांच्या अभाव, नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सुमित गिरासे,प्रतिनिधी शहादा

        शहादा नगर परिषद शहादा यांच्या कडुन मिळणाऱ्या विविध मुलभूत नागरी सुविधा पासून वंचित असलेले शहादे शहरातील असंख्य त्रस्त  नागरिक यांनी मुख्याधिकारी यांना मुख्याधिकारी दालनात वेठीस धरत निवेदन सादर केले
          निवेदनात म्हटले आहे की मुख्याधिकारी यांनी शहरातील विविध भागात उद्भवलेल्या निर्माण झालेल्या खालील मुलभूत नागरी सुविधा देण्यात सपशेल अपयशी ठरले म्हणून  जागृत आणि त्रस्त शहादेकर यांनी  खालील  समस्यांवर युद्ध पातळीवर तोडगा काढुन शहादेकर नागरिकांनि केलेल्या खालील नागरी सुविधांचा  मागण्या असलेल्या निवेदनाची दखल घ्यावी  संपूर्ण शहरातील  रस्ते खड्डे मुक्त करण्यात यावे, मेन रोड चार रस्ता पासून थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करुन त्या दरम्यान ची सर्व वहातुक अडथळे दूर करणे ,प्रशासक राजवटीत तयार झालेल्या आणि मुदतीत असलेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारा कडून करुन घ्यावी ,शहादा नगर परिषद शहादा यांच्या हद्दीतील त्यांना हस्तांतरित केलेल्या सर्व पाटचा-यांचा संपूर्ण गळ काढून स्वच्छ करणे, शहरात नियमित स्वच्छता साफसफाई करण्यात यावी, मच्छर निर्मूलनासाठी नियमित  फवारणी व धूर मशीन द्वारे करण्यात यावी, शहरातील प्रत्येक वस्तीत रोज घंटागाडी व्यवस्था व्हावी. जर ते येत नसेल तर त्यावर दंडात्मक कारवाई करून सदर ठेकेदारावर बँन करून , त्याचे बिल रोखून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,  शहरातील गटारी व नाल्यांची नियमित साफसफाई  करावी व वरून ते  बंदिस्त (उदा . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील नाल्यावर केल्या प्रमाणे)  करण्यात यावे , संपूर्ण जुन्या नव्या वसाहती आणि पुर्ण शहरात मच्छर निर्मूलनासाठी फवारणी करावी शहराच्या हद्दीतील काटेरी बाभूळ झाडे जेसीबीने काढण्यात यावीत, देशात सर्वाधिक पाणीपट्टी  वसूल करणारी नगरपालिकेने दररोज नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा वारंवार एक्स्प्रेस फिडरचा नावाखाली आणि सामाजिक माध्यमांवर संदेश प्रसारित करुन पाणी पुरवठा विस्कळीत करू नये, अतिक्रमण करून व्यावसाय करणारे लॉरीधारक आणि हाॅकर्स वाल्यांसाठी नगरपालिका क्षेत्रातील खुल्या जागेत त्यांची व्यवस्था करण्यात आली त्याच ठिकाणी स्वतंत्र इतर शहरांसारखी खाऊ गल्ली देखील करण्यात यावी, शहरात पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, शहरातील पथदिवे हे नादुरुस्त अथवा बंद असतात त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, स्वयं चलित व स्वयं नियंत्रित पथक दिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, शहादा नगरपालिकेची नागरिकांची सनद ही हक्काची आहे तरी त्या सनदामध्ये दिलेल्या तरतुदीचे नगरपालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचे तंतोतंत पालन करावे, शासनाने मंजूरी दिलेल्या भूमिगत गटारीचे व विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे कामकाज  त्वरित सुरू करण्यात यावे, शहादा शहर विकास कामातील रस्ते , गटारी , पथदिवे , पाणी पुरवठा , स्वच्छता , आरोग्य , घंटागाडी  व इतर सोयीसुविधांसाठी केले जाणाऱ्या कामांच्या दर्जा हा चांगला असावा जर त्यात चुकीचे आढळल्यास सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून त्याची देय रक्कम रोखून त्यावर दंड करण्यात येऊन कायमस्वरूपी त्यावर बंदी करण्यात यावी, दोंडाईचा रस्त्यावरील नगरपालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर करण्यात आलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी तसेच त्यावर प्रक्रिया करणे आणि संपूर्ण डंपिंग ग्राऊंडवर बंदिस्त संरक्षण भिंत बांधणे आणि तेथे मोठे वृक्ष लागवड करून हरित व्यवस्था करण्यात यावी 
    तमाम शहादेकर संवेदनशील नागरिक यांनी शहरातील विविध मुलभूत नागरी सुविधा आणि रोजनिशी उद्भवणा-या अनेक समस्यांच्या बाबत तक्रार निवेदन सादर केले ,  गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक राजवटीमुळे आणि नगर परिषद शहादा प्रशासनातील कामचुकार हलगर्जी आणि ढिम्म अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे शहरातील संवेदनशील नागरिकांना विविध मुलभूत नागरी सुविधा देण्यात सपशेल अपयशी ठरले असुन या अडीच वर्षांत शासनाकडून रोडरस्ते सहीत अनेक विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची झाला असून त्या निधी चा फायदा हा फक्त आणि फक्त टक्केवारी खानारे प्रशासनाला आणि गुणवत्ताहिन कुठला दर्जा नसलेल्या विकासकामे करणारे ठेकादारांचा झाला असून या अडीच वर्षांपासून फक्त व्यावसायिकता जोपासली गेली आहे करोडो रुपयांचा कर भरणारे करदाते नागरिकांच्या सुख सुविधा आणि आरोग्याशी प्रशासनाला काही एक देणे घेणे नव्हते त्यांनी कधीच कुठल्याही विकासकामांचा दर्जा तपासला नाही कधीही स्वच्छता ठेकेदाराला त्याच्या मनमानी पद्धतीने चालवलेल्या कारभाराला लगाम लावला वारंवार एक्स्प्रेस फिडरचा नावाखाली होणारा विस्कळीत पाणी पुरवठा दिवाबत्ती विभागाने ठेकेदारांवर केलेली करोडो ची खैरात अशा एक ना अनेक प्रश्न प्रशासक यांच्या कार्यकाळात उभे राहिले आहे म्हणून आम्ही जागृत शहादेकरांनी अनेक वेळा समाज माध्यमातून संताप व्यक्त केला तरी हे ढिम्म प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर याचा काहीच फरक पडला नाही म्हणून आम्ही आज या विविध प्रश्नांवर आणि आमच्या अधिकारातील मुलभूत नागरी सुविधांचा जाब विचारण्यासाठी  तक्रार निवेदन सादर करित केल्याचे म्हटले आहे . 
     निवेदनावर यशवंत चौधरी अनिल भामरे मनलेश जयस्वाल सुपडू खेडकर प्रा डी सी पाटील एडवोकेट सरजू चव्हाण, डॉ बी योगेश चौधरी, सुरेंद्र कुवर, राजेंद्र अग्रवाल, राकेश पाटील, मनोज चौधरी, गुरुचरण राजपाल, माधव पाटील, मोईन पठाण, एन डी पाटील, काशिनाथ पटेल बनेचंद जैन, धीरज जैन,  मोनू राजपाल, राहुल कोळी, दिनेश खंडेलवाल, सत्यानंद पाटील, लगीन पाटील जयेंद्र चव्हाण राहुल जैन, मुनेश जगदेव , गोपाल गांगुर्डे, राहुल कोळी, काशिनाथ पाटील, पंकज सोनार , भगवान गुजर, मुजफ्फर अली सह नागरिकांच्या साह्या आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने