**पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांनी पाणी उकडून प्यावे-** **वैद्यकीय अधिकारी डॉ ललितकुमार चंद्रे.** दोंडाईचा- (मुस्तूफा शाह.)



**पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांनी पाणी उकडून प्यावे-**

**वैद्यकीय अधिकारी डॉ ललितकुमार चंद्रे.**

दोंडाईचा- (मुस्तूफा शाह.) 
सध्या पावसाची संततधार सुरू असून वातावरणातील बदलामुळे विविध साथीचे आजार उदभवत आहेत. यात प्रामुख्याने अतिसार, हिवताप, डेंग सदृश आजार व मलेरिया यांच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. तरी घर व परिसरात स्वच्छता राखा, पाणी उकळून प्यावे, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा व घरासह परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले हात स्वच्छपणे धुवावे. तसेच फळे व पालेभाज्या शिजवण्यापूर्वी व खाण्यापूर्वी पूर्णपणे धुतलेले आहेत याची काळजी घ्यावी. पूरग्रस्त क्षेत्रामध्ये किंवा जवळपास राहत असल्यास बुडण्याचा धोका, विजेचा धक्का, जलजन्य आजार, जनीत आजार, अन्नजने आजार व सर्पदंश यांचा धोका असतो. तसेच आहारात शिळं अन्न व बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्यात लेप्टो स्पायरोसिस, हा आजार प्राण्यांच्या मुत्र व विष्ठा हे पाण्यात एकत्र येऊन त्या दुषीत पाण्याशी संपर्क होऊन होतो. म्हणून हा आजार टाळण्यासाठी रब्बरी बुट व हातमोजेचा वापर करावा. घरात उंदीर व घूशी यांच्यावर नियंत्रण ठेवावे. तसेच गाई व गुऱ्यांचे गोठे स्वच्छ ठेवावे. घरात "कोरडा दिवस" पाळावा. घराच्या आसपास, छोटे खड्डे असल्यास ते बुजून टाकावे. अन्यथा जे बुजवता येण्यासारखे नसतील त्यात अळीनाशक औषध किंवा गप्पे मासे टाकावे. घराभोवती प्लास्टिक बाटल्या, नारळाच्या करवंट्या, खराब टायर अशा खोलगट वस्तू साठू ठेवू नये. स्वच्छालयांच्या टाक्यांना त्वरित जाळी बसवावी. तसेच जपानी मेंदुज्वर व हत्तीरोग, हे आजार देखील, डास संक्रमानामुळे होतात. म्हणून कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास तो अंगावर न काढता नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासून घ्यावे कारण, एस्पिरीन, बुफ्रेन किंवा तत्सम औषध घेतल्याने डेंगू तापात रक्तस्तरावाची भिती असते. म्हणून सर्वांना आरोग्याचे जतन करण्याचे विनम्र आवाहन धमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने