*५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पुरवठा निरीक्षकाला अटक तळोदा तहसील कार्यालयातील प्रकार* *नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे*



*५०० रुपयांची लाच घेणाऱ्या  पुरवठा निरीक्षकाला अटक तळोदा तहसील कार्यालयातील प्रकार*

 *नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे* 

 *तळोदा* :-रेशन कार्ड बनवून देण्यासाठी
१ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करुन त्यातील ५०० रुपयांचा पहिला हप्ता घेताना तळोदा तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

प्रमोद विश्वासराव डोईफोडे, (४१) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे याने एकाचे रेशन कार्ड तयार करण्यासाठी १ हजार ५०० रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान तसा अर्ज संबधिताने सादर केल्यानंतर संबधिताकडून १ हजार रुपयेही घेतले होते. परंतू ५०० रुपये कमी दिल्याने पुरवठा निरीक्षक डोईफोडे याने रेशनकार्ड तयार करुन दिले नव्हते. यातून संबधिताने नंदुरबार लाचलुपचत प्रतिबंधक कार्यालयात संपर्क करुन तक्रार दिली होती. या तक्रारीची शहनिशा करत एसीबीने गुरुवारी सापळा रचला होता. यावेळी तक्रारदाराने ५०० रुपयांची लाच दिल्यानंतर ती स्विकारताना प्रमोद डोईफोडे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. याबाबत संशयित प्रमोद विश्वासराव डोईफोडे (४१) याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावित, हेमंत महाले, सुभाष पावरा, नरेंद्र पाटील, संदीप खंडारे, जितेंद्र महाले यांनी केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने