नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या* *नंदुरबार जिल्हा प्रतिनिधि सुमित गिरासे*




*नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या*

 *नंदुरबार जिल्हा प्रतिनिधि सुमित गिरासे* 

 *नंदुरबार* : जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस यांनी काढले आहेत. यातून रिक्त असलेल्या पोलिस ठाण्यांना नियमित पोलिस निरीक्षक मिळाले आहेत.

नवीन आदेशानुसार शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांची नवापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. शहर पोलिस ठाण्याचा भार पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांना दिला गेला आहे. नियंत्रण कक्षाचे दुसरे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्यावर तालुका पोलिस ठाण्याची जबाबदारी असणार आहे. अक्कलकुवा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील रुजू होणार आहेत. तळोदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप हे धडगाव पोलिस ठाण्याचा पदभार घेतील. धडगावचे इशामोद्दीन पठाण हे नियंत्रण कक्षात कार्यरत राहतील. नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

म्हसावदचे सहायक पोलिस निरीक्षक राजन मोरे हे शहादा पोलिस ठाणे, शहाद्याचे सहायक निरीक्षक गणेश वारुळे हे म्हसावद, अक्कलकुवा येथील सहायक निरीक्षक राजू लोखंडे हे तळोदा पोलिस ठाणे, सहायक निरीक्षक संदीप आराक सारंगखेडा, नवापूर सहायक निरीक्षक नरेंद्र साबळे हे विसरवाडी तर नियंत्रण कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज पटले यांची जिल्हा विशेष शाखेत पदभार स्विकारणार आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने