मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ शिरपुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा गट) वतीने मा.तहसीलदार यांना निवेदन




मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ शिरपुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा गट) वतीने मा.तहसीलदार यांना निवेदन 

*मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ शिरपुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा गट) वतीने मा.तहसीलदार यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी*

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झाल्याच्या निषेधार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा.सुनिल तटकरेसाहेब यांच्या आदेशाने दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 10 वाजता पाटील वाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मूक निषेध नोंदवत मा.तहसिलदार यांना दोषींवर कडक कारवाई करण्या संदर्भात निवेदन देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारण्यासाठी ज्या कंट्रक्शन कंपनीला अथवा ठेकेदारास काम देण्यात आले होते त्या कंट्रक्शन कंपनी अथवा ठेकेदार यांना काळया यादीत टाकुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देतांना बाळकृष्ण पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,हिराभाऊ  वाकडे शहराध्यक्ष, मंगेश भैरव ओबीसी सेल तालुकाध्यक्ष, युवराज राजपुत शहर कार्याध्यक्ष,वाजीद शेख अल्पसंख्याक प्रदेश सचिव, शांतीलाल कोळी तालुका उपाध्यक्ष, राजेंद्र बोरसे ओबीसी कार्याध्यक्ष,सुधीर चव्हाण तालुका उपाध्यक्ष, भुषण भदाणे तालुका उपाध्यक्ष युवक,भटु पाटोळे,गणेश देवरे व कार्यकर्ते उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने