डॉ. तुषार रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त हिसाळे ग्रामपंचायत व गोरक्षनाथ ट्रस्ट हिसाळे यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम
शिरपूर -दिनांक 28 ऑगस्ट रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष किसन विद्या प्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भाउसो .डॉ. तुषार रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त हिसाळे ग्रामपंचायत व गोरक्षनाथ ट्रस्ट हिसाळे यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता वृक्षारोपण गावातील अनेक वयोवृद्ध, तरुण व महिलांनी वृक्षारोपण भाग घेतला त्याप्रसंगी सरपंच उत्तम मला पावरा, उपसरपंच स्वाती विकास पाटील,माजी उपसभापती संजय पाटील, माजी उपसरपंच विकास पाटील ग्रामपंचायत सदस्य भास्कर गायकवाड, छाया पाटील ,राजू मोरे भिकुबाई कोळी, गुलाब पावरा ,गोरख पावरा ,माजी सरपंच विश्वासराव देवरे, प्रदीप बाविस्कर, माजी शि सां का . संचालक कांतीलाल पाटील, माजी सरपंच संतोष पवारा, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत कोळी सुनील कोळी,भाऊसाहेब कोळी व गोरक्षनाथ ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व कार्यकारणी सदस्य,कार्यकर्ते उपस्थित होते गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्याप्रसंगी ग्रामपंचायत वृक्ष संगोपन करणाऱ्या व्यक्तीस ग्रामपंचायतीच्या करातून सतत तीन वर्ष घरपट्टी पाणीपट्टीतून 10% टक्के सूट देण्याची जाहीर केले आहे.