भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना तर्फे
शिरपूर येथिल प्रांत कार्यालयावर विशाल मोर्चा!
शिरपूर - दिनांक 30 /08 /2024रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय ,तहसील कार्यालयांवर मोर्चा काढण्याचे नियोजन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलने नाशिक येथील बैठकीत घेतलेला आहे. .
त्याच्याच भाग म्हणून तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा, लाल बावटा शेतमजुर युनियन, आशा व गटप्रर्वतक संघटना यांच्या मूलभूत प्रश्नावर जात निहाय जणगणना त्वरित करावी तसेच 50% आरक्षणाची मर्यादा उठवण्यासाठी लोकसभेत कायदा पारित करावा !यासाठी 30/ 8 /24 रोजी च्या मोर्चाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच भाग म्हणून आमोदे येथील रामदेवजी बाबा मंदिर पासून दुपारी ठीक एक वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. मेन रोडने प्रांत कार्यालयावर दुपारी ठीक दोन वाजेच्या दरम्यान मोर्चा पोहोचेल. त्या ठिकाणी मोर्चातील मागण्यांच्या संदर्भात व सरकारचे शेतकरी शेतमजूर धोरणाणाबाबत. प्रमुख वक्त्यांची भाषणे होतील. त्यानंतर शिरपूर उपविभागीय अधिकारी. यांना शिष्टमंडळामार्फत मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या
जात निहाय जनगणना त्वरीत सुरू करा तसेच सर्वांना आरक्षणाच्या लाभ मिळण्यासाठी 50% ची मर्यादा उठवण्यासाठी लोकसभेत कायदा पास करा!
महाराष्ट्र शासनाने विविध योजना सुरू केल्यामुळे आधार कार्ड साठी तसेच इतर योजनांचे फॉर्म भरण्यासाठी शेतू धारकांकडून होणारी आर्थिक लुट त्वरीत थांबवा!
शिरपूर तालुक्यात आधार केंद्रांची संख्या वाढवा!
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा उत्पादन खर्च अधिक 50 टक्के स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा तसा हमी भावाच्या कायदा करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी! अनेर व करवंद प्रकल्प लाभार्थी शेतकऱ्यांची पाणीपट्टीची थकबाकी माफ करा! शेतकरी शेतमजुरांना दर महा पाच हजार रुपये पेन्शनच्या कायदा करा!
पात्र जे फार्म धारक जमीन धारकांना त्वरीत सातबारा द्या!
मागील वर्षी कापूस सोयाबीन लागवड करणारे पिक पहाणी ची नोंद नसली तरी सातबारा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राची मागणीने करता हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान ची रक्कम त्वरीत द्या!
पात्र वन जमिनीचा धारक शेतीची या वर्षाची पिक पाहणी लावण्यासाठी फॉरेस्ट विभागाला आदेश करा!
गायरान जमीन करणारे भूमी शेतमजुरांच्या नावे त्वरित करा!
शिरपूर तालुक्यात जून जुलै ऑगस्ट महिन्यापासून सतत सतत पाऊस येत असल्यामुळे पिकांचे नुकसान भरपाई 25 हजार रुपये त्वरीत द्या
2023 च्या पिक विम्याची नुकसान भरपाई रक्कम त्वरीत द्या.
शिरपूर तालुक्यातील निष्कृष्ट दर्जाचे रस्तांचे काम करणारे ठेकेदाराची चौकशी करा! व त्याचावर गुन्हे दाखल करा!
शिरपूर व सोनगीर चा टोल नाक्यावर फोरव्हिलर गाड्यांना
टोल फ्री करण्याचे आदेश करा !
आशा व गटप्रर्वतक ना शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या!
इत्यादी मागण्यांबाबत निवेदन दिले जाणार आहे.
मोर्चाचे नेतृत्व,
अँड.हिरालाल परदेशी.प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा,अँड संतोष पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिरपूर तालुका सचिव , अर्जुन दादा कोळी,रामचंद्र पावरा,सतीलाल पावरा,नारसिग पावरा,भरत सोनार ,जितेंद्र देवरे अरुणा देवरे ,स्मिता दोरीक हे करतील
शिरपूर तालुक्यातील शेतकरी ,शेतमजूर, कामगार, आशा व गटप्रर्वतक यानी आपल्या न्याय हक्कांचा मागण्यांबाबत मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित राहावे असे आव्हान.
भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फी करण्यात आली आहे.
