मोटार सायकल चोरी करणारा आरोपी 48 तासांत जेरबंद
चोरीच्या एकुण 8 मोटरसायकल जप्त चाळीसगांवरोड पोलीस स्टेशनची कारवाई
धुळे प्रतिनिधी - चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 48 तासांच्या आत आरोपीला जेलबंद करत त्याच्याकडून आठ मोटरसायकली जप्त करून इतर गुणांची उखल करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे.
धुळे शहरात वाढत्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत चिवरे सो, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सो. मा. सहा. पोलीस अधीक्षक सो धुळे शहर विभाग एस. संचिकेश रेड्डी मो, धुळे यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सुचना देवून आपआपल्या पोलीस स्टेशन हथीत होणाऱ्या मोटार सायकल चोरीबाबत दाखल गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आणाचे बाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे चाळीसगावरोड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याचाबत आदेशीत केले. दि 27/07/2024 रोजी वसीम हाशिम अन्सारी वय 33 वर्ष, रा. म्यूनिसिलपल कोलनी, शाळा क्र 51/52 चे मागे 80 फुटी रोड, धुळे यांचे मालकीची रॉयल इनफिल्ड कंपनीची काळया रंगाची बुलेट क्लासिक 350 मोटार सायकल ना एम एच 18 ए. व्हो 0881 ही कोणीतरी चोरुन नेली त्यावरुन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन भाग-5 गुरंन 193/2024 भारतीय न्याय संहिता अधि 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार रमाकांत पवार हे करीत होते.
चाळीसगांचरोडचे तपास पथक नमुद गुन्हयाचे तपासात असतांना सी. सी.टी.व्ही फुटेज व गुप्तबातमीदरा मार्फत माहिती घेतलो असता, सदर गुन्हा हा शाहरुख ऊर्फ कमरुह्योन शाह आसिफ शाह वय-21 वर्ष, रा. कवीरगंज सत्तारच्या वाडया जवळ हजरत मस्जिद जवळ, बाला हाजी यांचे किराणा दुकानजवळ, धुळे याने केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने सापळा रचुन, शिताफिने पाठलाग करुन पकडले असता, त्याने नमूद गुन्हयाची कबुली दिली आहे तसेच त्याने धुळे शहरातील ब-याच मोटार सायकल चोरल्याची कबुली देवून त्याच्याकडून दोन लाख 90 हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. मोटर सायकलची गाडी नंबर स्टेटस नंबर इत्यादी वरून मूळ मालकांच्या शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
अशाप्रकारे चाळीसगावरोड पोलीसांनी वर नमुद हस्तगत मोटार सायकल मधील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे गुरंन 150/2024, गुरंन 183/2024, गुरनं 193/2024, गुरंन 196/2024 व गुरंन 197/2024 प्रमाणे गुन्हयातील गेलेल्या मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगीरी केलेली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे सो, अपर पोलीस अधीक्षका किशोर काळे सो, मा. सहा. पोलीस अधीक्षक सो धुळे शहर विभाग एस. रुषिकेश रेडडी सो, धुळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि जियन बोरसे, पोसई विनोद पवार, पोसई शरद लेंडे, पोहेको। ललिचंद चौधरी, पोहेकी रविंद्र ठाकुर, पोहेको सुनिल पाथरवट, पोहेकी अविनाश वाय, पोहेकों रमाकांत पवार, पोको शोएब बेग, पोको अतिक शेख, पोकों/ विनोद पाठक, पोकों सिराज खाटीक, पोकों सचिन पाटील, पोकों। देवेंद्र तायडे अशांनी केली आहे.
