एका महिन्यात दुसऱ्यांदा पोलीस दगडफेकीचे शिकार तरुणाच्या मृत्यू प्रकरणात भाटपुरा गावातील घटना




एका महिन्यात दुसऱ्यांदा पोलीस दगडफेकीचे शिकार 

तरुणाच्या मृत्यू प्रकरणात भाटपुरा गावातील घटना

शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे.अश्रु धुरांच्या नळकांड्या फोडत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची गर्दी पांगवली.
शिरपूर तालुक्यात पोलिसांवर हल्ला करून दगडफेक केल्याची ही दुसरी घटना आहे.

या दगडफेकीत शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांसह कर्मचारी जखमी झाले आहेत.रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक करण्यात आली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात काल सायंकाळी एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनास्थळी थाळनेर पोलिस स्टेशनचे पथक दाखल झाले होते.मात्र वाद वाढण्याची शक्यता असल्याने आरसीपी पथकासह शिरपूर शहर, शिंदखेडा सह शिरपूर तालुका पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.यावेळी संशयिताला आमच्या ताब्यात द्यावा अन्यथा मृतदेह घेऊन जावू देणार नसल्याचा पवित्रा काहींनी तेथे घेतला.

पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी रुग्णवाहीका बोलवून मृत व्यक्तीला रुग्णवाहीकेत ठेऊन शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यास रवाना करतांना अचानक तुफान दगडफेक सुरू झाली. त्यावेळी काही पोलीस जखमी झाले आहेत.


यावेळी रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक झाली यात रुग्णवाहिककेची काचे फुटली मात्र चालक गजेंद्र राजपूत यांनी कुठलाही विचार न करता दगडफेकीतून रुग्णवाहीका जेमतेम गावाच्या बाहेर काढत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणली.

या दरम्यान गावात पोलिसांवर दगडफेक सुरु झाली.सुदैवाने पोलिसांनी भाटपुरा गावात जाण्यापूर्वीच स्वताच्या संरक्षणासाठी हेल्मेटसह वस्तू सोबत ठेवले होते.रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अंधारात गर्दीतून तुफान दगडफेक होत असल्याने अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडत पोलिसांनी गर्दी पांगवली.या दगडफेकीत पोलगस निरीक्षक के.के.पाटील यांच्यासह इतर दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने