मतदार राजा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो महाराष्ट्र किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचे जाहीर आवाहन




मतदार राजा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो 

महाराष्ट्र किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचे जाहीर आवाहन 

शिरपूर प्रतिनिधी - धुळे व नंदुरबार मतदार संघातील मतदार बंधूंना महाराष्ट्र किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून मतदार राजा जागा हो परिवर्तनाच्या धागा हो असे म्हणत आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद केले आहे की, आम्ही
शिरपूर तालुक्यातील मतदानावर बंधु  भगिनींना  नम्र आवाहन  करतो की,दिनांक 13/05/2024 रोजी महाराष्ट्रातील नं 1 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान आहे व 20/05/2024 ला धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदान आहे.
आपल्या नंदुरबार मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ.हिनाताई गावित  या भा.ज.पा चे उमेदवार आहेत. इंडीया आघाडीतील घटक पक्ष  व महाविकास आघाडीचे उमेदवार अँड गोवाल पाडवी यांच्यातच सरळ लढत आहे.अँड. गोवाल पाडवी.हे मा.आदिवासी विकास मंत्रि अँड. कै.सी.पाडवी याचे. चिरंजीव आहेत..अशा परिस्थितीत मतदार राजा हा कुणाचा पारडय़ात विजयाची माळ टाकणार हे 4जुन ला समजणार आहे. निवडणुकी पूर्वीच डाॅ.हिनाताई यानी एक प्रचार फेरी कामांचा उद्घाटनाचा माध्यमातून केलेली आहे. त्यापूर्वी मतदार संघातून त्या गायब होत्या.

त्या अगोदर खासदार निधीतील कामे परस्पर शिरपूर तालुक्यातील विकास पुरुष अमरिशभाई यांना विश्वासात न घेता रंधे परिवाराला हाताशी धरून शिरपूर तालुक्यातील गावाना देण्यात आलेली आहेत. खासदार डॉ.हिनाताई गावित यांची कामाची पद्धत पाहुन  अमरिशभाई पटेल याची पायाची आग मस्ताकाला भिडंली.सदरचा वाद मुख्यमंत्र्यांसह भा.ज.पा चा नेत्यांपर्यंत पोहचला सदर कामांना स्थगती देखील आणण्यात आली.त्यामुळे डॉ.हिनाताई  व डाॅ.आदिवासी विकास मंत्री डाॅ.विजयकुमार गावित  यानी देखिल अमरिशभाई ला डावलून रंधे परिवार गावा गावातील सरपंच काहि जि.प.सदस्य यांची वेगळी फळी  तयार केली. तालुक्यात  असे वातावरण तयार केले की.आपल्या सोबत  अमरिशभाई नसतील तरी शिरपूर तालुक्यातील मतदार आपणास  लिड देतील. त्यामुळेच शिरपूर शहरात एकाच दिवशी आमदार मा.काशीराम पावरा याचा वेगळा कार्यक्रम. व डाॅ.हिनाताई याचा वेगळा कार्यक्रम उघड्या डोळ्यानी शिरपूर तालुक्यातील जनतेने पाहीला.डॉ.हिनाताई  या पुन्हा त्याचा  विकास कामाचा जोरावर   निवडून येतील अशी भावना निर्माण करण्यात आली.

परंतु  प्रत्यक्षात  डॉ.हिनाताई महायुतीतील घटक पक्षानी देखील उमेदवारीस विरोध केला .नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील दोन तालुके शिरपूर व साक्री तालुक्यातील  मतदारावर दिसुन येत आहे.
अरे  असले तरी. डॉ.हिनाताई गावित याना सोपी वाटणारी निवडणुक अटीतटीची झालेली आहे.
त्यामुळेच डाॅ.हिनाताई गावित यांना अमरिशभाई पटेल यांची गरज भासु लागली.त्यामुळेच भा.ज.प नेतृत्व यानी अमरिशभाई पटेल याना सागितलेकी डॉ.हिनाताई गावित साठी नव्हे तर नरेंद्र मोदी साठी मते मागा .यासाठी नाईलाजास्तव जनकव्हीला येथेच  सभेची व्यवस्था  करुन गटवार सभेचा धडका लावला. जनक व्हिलावर लोकप्रतिनिधींकडून लोकाना आणणे त्याची सर्व व्यवस्था करणे यासाठीच उमेदवारास प्रचंड आर्थिक खर्चात टाकणे.असे उद्योग सुरु करुन मत मात्र नरेंद्र मोदी साठी मागणे .हे उमेदवार डॉ.हिनाताई गावित यांच्या लक्षात आल्यावर देवेन्द्र फडवणीस यांचा विजयी संकल्प मेळावा आयोजित केला.
त्यासाठी देखील प्रायव्हेट गाड्या लावुन 200ते 500रुपये पर्यंत रोज मतदारांना द्यावे लागने या म्हणतात उमेदवार ची आर्थिक कोंडी करणे.मदत तर करणे पण अशी मदत करणे की उमेदवार पाच वर्ष लक्षात ठेविल याला म्हणतात मजबुरी का नाम महात्मा गांधी.
डाॅ.हिनाताई गावित याना ऐवढी मजबुरी येईल असे स्वप्नात  देखील नसेल.
म्हणून मतदारोनो जागे व्हा यांचे भांडण निधीतून मिळणारे कमिशन हा या वादाचा केंद्र बिंदु आहे. 
म्हणून याचा  नादांत न पडता सरळ अँड  गोवाल पाडवी याना मतदान करुन आपल्या मतदारसंघात परिवर्तन घडवून आनु.
भा.ज.प मोदी सरकार शेतकरी.शेतमजूर,कामगार विरोधी धोरण राबवित आहे.त्याचे दहा वर्षांत  अनुभव आलेला आहे.
लोकशाहीतील चार स्तंभावर  त्यानी आघात केलेला आहे.
या देशात 382 दिवस शेतकरीवर्गास आदोंलन करावे लागले.तरीही नरेंद्र मोदींनी एक दिवस हि चर्चा  केली नाहि.पाच मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतर देखील दोन वर्षापासून  हमी भावचा कायदा केला नाही.केंद्रातील. 34 लाख जागा रिक्त आहेत .इलेक्ट्रॉल बाॅन्ड चा माध्यमातून करोडो रुपायाचा निधी जमवला.ईडी.सी.बी.आय.इन्कमटॅक्स  याच्या धाडी घालुन कंपन्यांकडून निधी वसुल केला .राजकीय पक्षांना चोरण्याचे काम केले.त्यांचा आला म्हणजे पवित्र नाही गेलाकी जेलात. 

मागील निवडणुकीत विकास पुरुष अमरिशभाई पटेल यानी अँड  के.सी .पाडवी चा निवडणुकीतील प्रचार सभेत सागितले होते की मरते दम तक कांग्रेस  नहि सोंडुगा. असे सांगणारे भाईचा जनक  व्हिलावर  व आर. सी .पटेल चा संस्थेचा संचालकांचा घरावर धाडी टाकण्यात आल्या व त्यास विरोध केल्यामुळेच प्रभाकर चव्हाण याना जेल मध्ये देखील राहावे लागले.त्यामुळेच विकास पुरुषाचा पायाखालील वाळु  सरकून भा.ज.पा.त दाखल झाले .आणी शिरपूर तालुक्यातील काँग्रेस चा बालेकिल्ला एका दिवसात कोसळला.हे आपण सर्वानी पाहिले.
हे जनते साठी झाल का , शेतकऱ्यांसाठी झाले का? आपणा जेलची हवा खायायला मिळु नये फक्त आणी फक्त  याची साठीच भा.ज.प मध्ये जावे लागले.भा.ज.प.त गेल्यावर  देखील  साखर कारखाना सुरु होऊ शकली नाही.सर्व  सहकारी उद्योग बंद आहेत. 

या सर्व गोष्टींवर सदसद्विवेक बुध्दी विचार  केल्यास याचा मागे न लागता   .आपले स्वतंत्र मत.धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डाॅ  शोभा  बच्छाव   याना द्यावे  व नंदुरबार मतदारसंघातील उमेदवार अँड गोवाल पाडवी हे स्वच्छ,चारित्र्य संपन्न,आपल्या बाजुने   कायदे बनविण्यासाठी कायद्याचा पदवीधर,तरुण,तडफदार  उमेदवार अँड गोवाल पाडवी  व शोभा बच्छाव  याना आपले बहुमुल्य मत देऊन प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यात आपले मतदान करा!!
असे आवाहन महाराष्ट्र किसान सभा,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,लाल बावटाशेतमजूर युनियन,आयटक संलग्न सर्व संघटना करीत आहोत.  या पत्रावर अँड हिरालाल परदेशी 
प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र ,काॅ.वसत पाटील ,भा .क.प. जिल्हासचिव धुळे ,काॅ.पोपटराव चौधरी ,
Lभा.क.प.धुळे शहर सचिव ,
अँड संतोष पाटील. शि.ता.भा.क.प सचिव. ,
काॅ.जितेंद्र लोटन देवरेशिरपूर शहर भा.क.प सचिव ,काॅ.नाना पाटील शिंदखेडा ता.भा.क.प सचिव ,काॅ.शंकर पाटील साक्री.ता.भा.क.प.सचिव ,
काॅ.रामचंद्र पावरा किसान सभा नेते ,
काॅ.सतिलाल पावरा धुळे जिल्हाध्यक्ष किसान सभा,काॅ.नारसिग पावरा,
शि.ता.अध्यक्ष किसान सभा,शिलदार पावरा 
जेष्ठ नेते किसान सभा,साहेबराव पाटील ,राज्य कौन्सिल सदस्य. भा.क.प.,अर्जुन दादा कोळी भा.क.प,काॅ.भरत सोनार ,शि.ता.शेतमजूर युनियन अध्यक्ष. ,सर्व संघटना याचे पदाधिकारी . यांच्या सही आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने