वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान शिरपूर तालुक्यातून सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करणारे पर्यावरण प्रेमी , वृक्ष मित्र




वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान 

शिरपूर तालुक्यातून सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करणारे पर्यावरण प्रेमी , वृक्ष मित्र 

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील पर्यावरण दूत वृक्ष मित्र म्हणून देशभरात ओळख असलेले शिवाजी राजपूत यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या मानाच्या शिरपेशात आणखी एक मानाच्या तुरा रोवला गेला आहे.



यापूर्वी शिरपूर तालुक्यातून वृक्ष मित्र म्हणून ओळख असलेल्या शिवाजी राजपूत यांना पर्यावरण व वृक्ष संवर्धन, सर्वाधिक वृक्षांची लागवड बांबूची लागवड, नागरिकांचे वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रम अशा अनेक उपक्रमांची राज्य व देश पातळीवर दखल घेत त्यांना यापूर्वी विविध मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना सामाजिक कार्य वृक्ष लागवड व पर्यावरणावर अतुलनीय कामगिरीबद्दल गांधी पिस फाउंडेशन नेपाळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.लालबहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील गुनी जणांना डॉक्टरेट पदवी ने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास स्वामी श्रीकंठनंदनजी जागुत भारत अभियान व मराठी अभिनेत्री सौ.स्मिता प्रभू व गांधी पीस फाउंडेशन नेपाळ भारताचे प्रभारी डॉ.सुनील सिंग परदेशी यांच्या हस्ते नाशिक येथील सातपूर, नाईस संकुल येथे पदवीदान कार्यक्रम समारंभात शिवाजी राजपूत यांना मानद डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली. वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांचे ३१ वर्षापासून पर्यावरण क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी लाखो वृक्ष लावून संवर्धन केले आहे. ते आता डॉक्टरने सन्मानित झाले.  त्यांच्या या यशस्वी निवडीबद्दल व पुरस्काराबद्दल सर्व समाज माध्यमातून राजकीय सामाजिक क्षेत्रातून त्यांच्या या यशाने सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने