शहादा ते धडगांव रस्त्यावरील खड्डे बुजवा,बिरसा फायटर्स आक्रमक, ७ जूनला घंटानाद आंदोलन*




*शहादा ते धडगांव रस्त्यावरील खड्डे बुजवा,बिरसा फायटर्स आक्रमक, ७ जूनला घंटानाद आंदोलन* 

शहादा प्रतिनिधी-शहादा ते धडगांव मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर पर्यंतचा खड्डेमय रस्ता तात्काळ दुरूस्त करण्यात यावा, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन मा.तहसीलदार तहसील कार्यालय शहादा जि.नंदुरबार यांना दिनांक १६/०५/२०२४  रोजी बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आले होते.तरीही सदर मार्गावरील रस्ता हा खड्डेमयच आहे,नादुरुस्त आहे.शहादा ते धडगांव मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर पर्यंतचा ८ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे.या मुख्य रस्त्यावरून शहादा ते धडगांव येथे जाणारी एसटी दररोज जात असते.हा रस्ता मुख्य असल्यामुळे प्रवाशी याच मार्गाचा वापर करतात. परंतु हा रस्ता अनेक वर्षांपासून खुप खड्डेमय आहे,मोठ मोठे खड्डे या रस्त्यावर झाले आहेत.खड्डेमय रस्त्यामुळे १० मिनीटाच्या प्रवासाला ३० ते ४५ मिनीटे प्रवासाला लागत आहेत. रस्त्यावरून वाहने जातांना भयंकर मातीची धूळ उडून प्रवाशांना त्रास होत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांना गंभीर दुखापत होत आहे.प्रवाशांना  लाज वाटेल असा भंगार रस्ता झाला आहे.काही ठिकाणी या मार्गावर रस्त्याचे काम चालू आहे.परंतु तेही मंद गतीने काम सुरू आहे.येणा-या जाणा-या प्रवाशांना रोज भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.वाहने भंगार होत आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो.रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. 
                    शहादा ते धडगांव मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर रस्ता तात्काळ दुरूस्त करण्यात यावा ,या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून दिनांक  ०६/०६/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता म्हसावद ते आमोदे रस्त्यावरील खड्ड्यासमोरच घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,विभागीय सचिव किशोर ठाकरे,नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे, जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते,वडगांव गाव अध्यक्ष राहूल चव्हाण ,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,अरूण पावरा,गुलाबसिंग पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने