दोडाईचा येथे ऊबाठा सेनेचा मोर्चा
वीज पुरवठ्यातील अनियमीतता त्वरीत कमी करा
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अनियमीत वीज पुरवठा केला जात आहे. जेथे उष्माधाताने ४-५ जगांना आपला प्राण गमवावा लागला. उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात सूरु असुन सध्या तपमान ४२-४६ से. एवढे वाढले आहे. अशा या भयंकर स्वरुपात उष्णता वाढली असतांना वीज वेळी अवेळी जाते. त्याचा परीणाम बाळ वृध्दांना होत असुन लहना मुले, तसे वृध्द यांचे अतोनात हाल होत आहेत. अशा वेळेस एकीकडे शासन उष्माघातापासून वाचण्यासाठी उपाययोजना करत आहे.
तेथे आपल्याकडून अनियमीत वीज पुरवठ्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. दिवसातुन जवळपास १५-२० वेळा तसेच रात्री अपरात्री विद्युत पुरवठा बंद होत असल्यामुळे अतोनात हाल होत आहे. त्यासाठी कोणतेही सबळ कारण नसतांना, पाऊस पाणी सुरु नसतांना, वादळ वारे नसतांना, अशा प्रकारे विज पुरवठा होत असेल तर येत्या १५ दिवसांत पावसाळा सुरु झाल्यावर किती त्रास होईल याची कल्पना न केलेली बरी. तसेच वीज बीलात सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे व आपल्या कार्यालयातील संपर्क सेवा बंद असते किंवा उचलले जात नाहीत तक्रारी कोणाकडे कराव्यात हे नागरीकांना समजत नाही. भ्रमणध्वनीवर अधिकाऱ्यांना संपर्क केला असता उर्मटपणे उत्तरे दिली जातात. तसेच खोटे बोलुन वेळ काढू पणा करतात.
आपण त्वरीत याबाबत लक्ष देवून उपययोजना करावी व सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा. अन्यथा आम्हास अक्रमक पवित्र घ्यावा लागेल. त्यामुळे होणाऱ्या त्रासास आपण सर्वस्व जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी. सदर लोक हित तक्रारीचा गांभीर्याने विचार व्हावा.

