लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हसावद गावात करण्यात आला फ्लॅग मार्च, रूट मार्च*




*लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हसावद गावात करण्यात आला फ्लॅग मार्च, रूट मार्च* 


      शहादा - म्हसावद पोलीस ठाणे येथे आज दि.04/05/2024 रोजी आगामी लोकसभा निवडणुक -2024 व कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यांच्या आदेशाने, अपर पोलिस अधीक्षक श्री निलेश तांबे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा भाग शहादा श्री दत्ता पवार सो, यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद गावात पोलीस स्टेशन येथुन मच्छी बाजार, बाजार चौक, बहिरोम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साई बाबा मंदिर, सरदार पटेल चौक, धनगर गल्ली, अहिल्याबाई पुतळा, ग्रामीण रुग्णालय म्हसावद, आंबाजीमाता मंदिर व पोलीस ठाणे येथे समाप्त झाले. सदर रुटमार्च कामी
 *SDPO-01 शहादा भाग शहादा, अंम-03
*C.I.S.F कंपनी क्र. 612,अधि-02 ,जवान-60
*B.S.F.अधि-02 ,जवान-48 ,*म्हसावद पोस्टे अधिकारी/अंमलदार प्रभारी अधिकारी राजन मोरे, पीएसआय जितेंद्र पाटील,पीएसआय बडगुजर.पो.अंम- 14,होमगार्ड 14
     असे हजर होते. सदरचा रुट मार्च हा सकाळी 10.00 वाजता सुरु होऊन 11.00 वाजता समाप्त झाला. तसेच म्हसावद गावातील लोकांशी आगामी लोकसभा निवडणुक-2024 च्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली असता शांततेत पार पडतील असा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. रूट मार्च बाबत सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आलेला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने