लोकसभा निवडणुकीचा प्रचार संविधानाचा आधार संपादकीय - महेंद्रसिंह राजपूत




लोकसभा निवडणुकीचा प्रचार संविधानाचा आधार

संपादकीय - महेंद्रसिंह राजपूत

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू असून राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र ज्या संविधानाने लोकशाहीची मूल्य जपत स्वातंत्र्याच्या अधिकार दिला आज त्याच संविधानाचा आधार घेऊन काँग्रेस पक्ष प्रचार करत आहे. काँग्रेस कडून व महाविकास आघाडी कडून निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक खासदारकीच्या उमेदवारांनी प्रचार करताना हातात संविधान घ्यावे अशा सूचना राहुल गांधीं यांच्याकडून देण्यात आले आहेत असे वृत्त आहे.
यामागे देशातील संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम आहे असं संदेश देण्याचा प्रयत्न आहे.



नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी हे देखील आपले उमेदवारी जाहीर झाल्या नंतरच्या पहिल्या दिवसापासून आपल्या हातात संविधान घेऊन निवडणूक प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत संविधान या मुद्द्याला देखील अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. 

काय आहे संविधानाचे राजकारण..

देशा वर अनेक वर्ष राज्य केल्यानंतर 2014 मध्ये देशात सत्तांतर होऊन भारतीय जनता पार्टी पक्ष सत्तेत आली. दहा वर्षाच्या कालावधीत भाजपावर भ्रष्टाचार हुकूमशाहीचे आणि संविधानिक संस्थांवर  व स्वायत्त संस्था यांचेवरअतिक्रमण केल्याचे अनेक आरोप झाले.  मागील काळात भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून भाजपाला पुन्हा बहुमत प्राप्त झाल्यास संविधानात बदल करून संशोधनाची गरज आहे असे मत व्यक्त केले होते. 
त्यामुळे विरोधी पक्षाकडून या निवडणुकीत सातत्याने भारतीय जनता पार्टीवर भाजपा सत्तेत आल्यास देशाचे संविधान बदल करेल अशी भीती व्यक्त करत आरोप करण्यात येत आहे. देशातील लोकशाही नष्ट करून हुकुमशाही स्थापन करण्यासाठी त्यांना संविधानात बदल करावयाच्या आहे आणि म्हणूनच त्यांनी 400 पार ची घोषणा केली आहे असा आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून होत आहे. काही राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून देश आता रशियाच्या मार्गावर असून एक पक्षी लोकशाही स्थापन करण्याच्या भाजपाच्या पुढील डाव आहेत असं देखील आरोप केला आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन याप्रमाणे मोदी पुन्हा सत्ता मिळाल्यास संविधानात बदल करून देशातील आरक्षण नष्ट करत हुकुमशाही राजवट लागू करतील अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने या मुद्द्याला प्रमुख आधार देत भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसला विजयी करा असे आवाहन करून उमेदवारांच्या हाती संविधानाची प्रत देऊन  प्रचार केला जात आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करण्यासाठी पुन्हा महाविकास आघाडीला सत्ता द्या असे देखील प्रचार केला जात आहे. 

तर दुसरीकडे संविधान बदलाच्या वृत्ताला भाजपाकडून उत्तर देण्यात येत असून हा खोटा प्रचार असल्याचे सांगत या देशातील संविधान कोणीही कधीही बदलू शकत नाही असे सांगितले जात आहे. मात्र मागील काळात ज्या पद्धतीने मनमानी निर्णय भाजपाने घेतले आहेत त्यामुळे आता भाजपाच्या बोलण्यावर लोकांच्या विश्वास उरलेला नाही.

 मागील काळात मोदी सरकारने ज्याप्रमाणे बहुमताच्या फायदा घेत अन्यायकारक असे निर्णय घेतले, शेतकऱ्यांच्या प्रखर विरोध असलेले तीन काळे कायदे याच सरकारने अमलात आणले होते, 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बलिदान झाल्यानंतर तीन अन्यायकारक कृषी कायदे त्यांना मागे घ्यावे लागले, जीएसटी मुळे देशातील उद्योग धंदे नष्ट होऊन बेरोजगारीत वाढ झाली, नोटबंदी ने देश आर्थिक खाईत गेला, देश महागाई मुळे होरपडून निघाला, त्याचप्रमाणे भविष्यात भाजपाचे पुन्हा सत्ता आल्यास ते देशातील आरक्षण नष्ट करून संविधानात बदल करून यापुढे देशात निवडणुका होऊ देणार नाहीत अशी  भीती विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा संविधानाला महत्त्व प्राप्त झाले असून लोकशाही मूल्यांची रक्षण करण्यासाठी , संविधानाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन संविधान हातात घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. 

आणि म्हणून नंदुरबार मतदार संघात देखील काँग्रेसचे उमेदवार आपला प्रचार करत असताना संविधान सोबत ठेवून व भाषण करत असताना संविधान समोर ठेवून आपल्या निवडणूक प्रचार करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कधी नव्हे तो प्रचारात संविधानाच्या आधार घेताना उमेदवार दिसत आहेत. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने