लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, मतदान यंत्र सेटिंग व सीलिंग चे कामकाज




लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज,
मतदान यंत्र सेटिंग व सीलिंग चे कामकाज 

शिरपूर प्रतिनिधी - नंदुरबार (अ.ज.) लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे अनुषंगाने दि.०४-०५-२०२४ रोजी शिरपूर तालुक्यातील ३३३ मतदान केंद्रा वरील मतदान यंत्र व २०% राखीव मतदान यंत्र असे ऐकून ३९९ मतदान यंत्र (ई.व्ही.एम) मशिनचे सेटिंग व सिलिंगचे कामकाज स्व.मुकेश पटेल टाऊन हॉल करवंद नाका शिरपूर येथे सुरु करण्यात आले असून सदर कमी एकूण ३३ टेबल ची व्यवस्था करण्यात येऊन सदर कामकाज करणे कामी सेक्टर अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल , कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 



तसेच सदर ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी यांचे उपस्थितीत 5% मतदान यंत्रांवर 1000 मत देऊन मॉक पोल करून मतदान यंत्र तपासणी करण्यात आली आहे. 
तसेच सदर दिवशी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) बँगलोर येथील इंजिनिअर श्री.भारतेंदु तिवारी व स्वेता चळवडे यांचे उपस्थितीत वी वि पॅट वर चिन्ह अपलोडचे कामकाज करण्यात आले. 



सदर कामकाज हे डॉ.शरद मंडलिक सहा.निवडणुक निर्णय अधिकारी शिरपूर व महेंद्र माळी तहसीलदार शिरपूर, यांचे मार्गदर्शना खाली करण्यात येऊन सदर ठिकाणी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, नायब तहसीलदार महेश साळुंखे, नायब तहसीलदार रवींद्र कुमावत, नायब तहसीलदार विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी संजय पवार हे उपस्थितीत होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने