*शिंदे फाट्या नजीक चार लाखाचा विमल गुटखा पकडला ;अखेर शहाद्याचा विमल तस्कर पोलिसांच्या जाळ्यात*
*स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई*
नंदुरबार
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तंबाखू मिश्रित विमल गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने नंदुरबार तालुक्यातील शिंदे फाट्या नजीक पकडला या पथकाने 4 लाख 17 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा व 5 लाख रुपये किंमतीचे चार चाकी वाहन असा सुमारे 9 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी तीन जणांवर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहाद्यातील एका विमल तस्कराचा समावेश असल्याने चोरीछुपे विमल तस्करीचा धंदा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या निझर येथून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखू मिश्रित विमल गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होतं असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार काल दिनांक 29 रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर ते शिंदे फाट्या नजीक शहादा रस्त्यावर सापळा लावण्यात आला त्याचवेळी एम एच.39 ए.डी.2058 ही मारुती सुझुकी कंपनीची इको कार्गो पांढऱ्या रंगाचे चार चाकी वाहन शिंदे फाट्याजवळ शहाद्याकडे येताना दिसले पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यात विमल गुटखा आढळून आला पोलिसांनी सदर वाहन नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात आल्यानंतर या वाहनातील 4 लाख 17 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा व 5 लाख रुपये किमतीचे चार चाकी वाहन असा सुमारे 9 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस शिपाई विजय धिवरे यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र मिहिलाल अग्रवाल ( रा.गांधीनगर- शहादा) दादाभाई शिवदास शिरसाट (रा. तऱ्हावद ता. तळोदा) बबलू मराठे( रा. निझर ) या तिघा आरोपींविरुद्ध भाधवी कलम 328, 272 , 273 अन्नसुरक्षा मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून राजेंद्र अग्रवाल व देविदास शिरसाट या दोघांना ताब्यात घेतले आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत
