गृहनिर्माण अभियंत्यास हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक
साक्री - जनसामान्यांना हक्काचे घर प्राप्त व्हावे म्हणून शासन स्तरावरून विविध योजना राबविल्या जातात. यात सध्या पंतप्रधान आवास योजना नावाच्या योजनेच्या देखील समावेश झाला आहे. मात्र या योजनांच्या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत आहे. अशाच एका घरकुलच्या प्रकरणात एक हजार रुपयांची लाज मागणाऱ्या गृहनिर्माण अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करत पुन्हा दाखल केला आहे.
आरोपी परेश प्रदिपराव शिंदे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती, साकी जि. धुळे यांनी तक्रारदार यांचेकडुन १,०००/- रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
तकारदार हे मौजे घोडदे ता. साकी जि. धुळे येथील रहिवासी असुन त्यांना शबरी आवास योजने अंतर्गत सन २०२३- २०२४ मध्ये मौजे घोडदे ता. साकी येथे घरकुल मंजुर झाले आहे. सदर घरकुलाचे झालेल्या बांधकामाचे फोटो काढून नजरी तपासणी करुन त्याचे मुल्यांकन साकी पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदार यांनी पंचायत समिती कार्यालय, साकी येथील घरकुल विभागातील ग्रामीण गृह निर्माण अभियंता परेश प्रदिपराव शिदि यांची भेट घेतली असता त्यांनी तकारदार यांचे मंजुर घरकुलाचे फोटो काढुन नजरी तपासणी करुन त्याचे मुल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर करुन धनादेश काढून देण्याचे मोबदल्यात तकारदार यांच्याकडे १०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तकार तक्रारदार यांनी दिनांक १५.०४.२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात दुरध्वनी व्दारे माहिती दिली होती.
सदर माहिती वरुन धुळे ला.प्र. विभागाच्या पथकाने मौजे घोडदे ता. साकी येथे जावुन तक्रारदार यांची भेट घेवुन त्यांची तक्रार नोंदवून दि. १५.०४.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपी शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडे १,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम सुरत महामार्गावरील घोडदे गावाच्या सर्व्हिस रोडवरील बसस्थानकाजवळ त्यांचे कारमध्ये पंचासमक्ष तकारदार यांचेकडुन स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडले असुन परेश प्रदिपराव शिंदे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती, साकी यांचे विरुध्द साकी पो.स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
