भारतीय जनता पार्टीच्या विरोधात क्षत्रिय,राजपूत समाजाची एकजूट, विविध राज्यात विरोध प्रदर्शन धुळे नंदुरबार जिल्ह्यात देखील विरोधाचा वणवा पेटणार? लोकसभा उमेदवारांवर संक्रांत




भारतीय जनता पार्टीच्या विरोधात क्षत्रिय,राजपूत समाजाची एकजूट, विविध राज्यात विरोध प्रदर्शन 

धुळे नंदुरबार जिल्ह्यात देखील विरोधाचा  वणवा पेटणार? लोकसभा उमेदवारांवर संक्रांत 

महेंद्रसिंह राजपूत 

देशात लोक सभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असून लोकसभेच्या पहिला टप्पा जवळ आला.
एकीकडे भाजप देशात चारशे पार नारा देत असताना अनेक राज्यात मात्र भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे. भाजप पुन्हा सत्तेवर येण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच स्तरावर उपाययोजना करत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र सध्या देशात भाजपाला विरोध देखील वाढतांना दिसत आहे.
यापूर्वीच सत्तेत असणाऱ्या भाजपच्या विरोधात आता सर्व विरोधक एकवटले असून देशभरात भाजपा हटाव चा नारा दिला जात आहे.

देशातील काही प्रमुख राज्यात राजस्थान गुजरात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रात क्षत्रिय समाजाने भारतीय जनता पार्टीला प्रखर विरोध करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशात देखील क्षत्रिय समाज भाजपाच्या विरोधात उतरला आहे. उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद मधून वि के सिंह यांचे तिकीट कापल्यानंतर राजपूत महासभा भाजपाच्या विरोधात सक्रिय झाले आहे.  यात भाजपावर असा आरोप करण्यात आला आहे की गाजियाबाद आणि नोयडा सारख्या भागात राजपुतांचे प्राबल्य असताना देखील राजपूत समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे गुजरात राज्यातील मंत्री पुरुषोत्तम रूपाला  यांनी राजपूत समाजाच्या महिलांबाबत अपमान जनक टिपणी केली. राजपूत समाजाच्या गौरवशाली इतिहासाची विडंबना केली. त्यामुळे गुजरात मध्ये देखील समस्त राजपूत समाज भाजपाच्या विरोधात मैदानात उतरला आहे. राजकोट मधून भाजपाची उमेदवारी करणाऱ्या रूपाला यांनी वारंवार राजपूत समाजाची माफी मागून देखील हा विरोध कमी न होता तो दिवसेंदिवस वाढत आहे. असाच प्रकार उत्तर प्रदेशात देखील सुरू असून राजपूत समाजाची दिग्गज नेते राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ हे समाजाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आतापर्यंत त्यांना अपयश आले आहे.

मात्र पश्चिम युपी मधील राजपुतांचे भावना अत्यंत तीव्र असून भाजपाच्या लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी विविध ठिकाणी क्षत्रिय संघर्ष समिती स्थापन करून स्वाभिमान महाकुंभ चे आयोजन केले जात आहे. यात राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा गुजरात आणि महाराष्ट्रातील मोठे नेते सहभागी होत आहेत. भाजपा कडून वारंवार समझोता करण्याचा प्रयत्न होत असताना देखील हा सगळा प्रयत्न झुगारून क्षत्रिय राजपूत समाजाकडून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वाभिमान महापंचायतीचे आयोजन केले जात आहे. आणि सार्वजनिक रित्या शपथ देऊन आम्ही क्षत्रिय राजपूत भाजपा व त्याच्या कोणत्याही उमेदवारास मतदान करणार नाही अशी शपथ दिली जात आहे. या महापंचायत मध्ये रघुकुल रीत सदा चली आई  प्राण जाये पर वचन न जाये अशी घोषवाक्य देऊन भाजपच्या विरोधात लोकांना प्रेरित केले जात आहे.

याच प्रकरणात राजपूत समाजाचे प्रतिनिधित्व करणारे दिग्गज नेते महिपाल सिंह मकराना, डॉक्टर राज शेखावत ओकेंद्र राणा इत्यादी नेत्यांना भारतीय जनता पार्टी कडून अटक करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी कडून पोलिसीबळाचा वापर केला जात आहे. याबाबत देखील प्रचंड प्रमाणात नाराजी आहे.याच्या देशभरातून विरोध होत आहे. त्यामुळे राजपुतांचे प्राबल्य असणारा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. 

विरोधाचे लोन आता धुळे नंदुरबार जिल्ह्यात देखील वाढले...

देशात इतकी मोठी घटना मोठ्या प्रमाणावर घडत असताना देखील गोदी मीडियाने सदरची बातमी लपवली असून याला कोणतीही प्रसिद्धी दिली जात नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधाचे हे लोन आता घराघरात पसरत असून त्याची आग आता धुळे नंदुरबार मतदार संघात देखील पोहोचली आहे. शिरपूर तालुक्यातील देखील विरोधाचे सूर पुढे येताना दिसत असून आगामी काळात सामाजिक मिटिंगांचे आयोजन करून देशातील राजपूत समाजासोबत आपण राहून आपली ताकद वाढवली पाहिजे आणि समाजाच्या निर्णयाला साथ देत भाजपला आपली जागा दाखवली पाहिजे असा निर्धार होताना दिसत आहे. याबाबत राजपूत समाज एकजूट झाल्यास लोकसभा निवडणुकीवर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर क्षत्रिय राजपूत समाज असून तो विखुरलेल्या स्वरूपात आहे, त्याला कोणतेही प्रखर नेतृत्व नाही मात्र ज्यावेळेस गोष्ट समाजाच्या स्वाभिमानाची असते त्यावेळेस सर्व गोष्टी विसरून समाज एकत्र होत असतो. त्यामुळे या सर्व घटनांची नोंद घेता धुळे नंदुरबार जिल्ह्यात देखील आगामी काळात भाजपच्या विरोधात राजपूत समाज एकवटल्यास त्याची झड लोकसभा उमेदवारांना बसणार आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमीच राजपूत समाजाला गृहीत धरले असून वारंवार अपमान केला जात आहे. मागील काळात जळगाव जिल्हा राजपूत समाजाचे आंदोलन झाले. यात गिरीश परदेशी यांनी आंदोलन करून समाजाचे काही प्रमुख मागण्या पुढे केल्या होत केल्या होत्या.या आंदोलनात आश्वासन देऊन देखील एकही आश्वासनाची पूर्तता भारतीय जनता पार्टी कडून झाली नाही. राजपूत समाजाचे महामंडळ स्थापन करून अशी घोषणा देखील करण्यात आली होती मात्र याबाबत एकही पाऊल पुढे उचलण्यात नाही.शिरपूर तालुक्यात देखील वारंवार विविध आश्वासन देऊन देखील त्यांची देखील पूर्तता झाली नाही. अनेक वर्षांपासून शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्र गौरव महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मागणी आहे. प्रत्येक पंचवार्षिक ला याबाबत आश्वासन दिले जाते मात्र कृती कोणतीही होत नाही.  याबाबत नाराजी व्यक्त करत काही समाज बांधवांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करून सामाजिक आवाहन केले आहे. 

 या सर्व गोष्टींची नाराजी देखील या प्रकरणात उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील काळात हे प्रकरण नेमके काय वळण घेईल येणारी वेळ सांगू शकेल मात्र अजून तरी ही नाराजी दूर करण्यात सध्या उत्तर महाराष्ट्रात भाजपाला अपयश येत असून विरोधाचे सूर वाढत राहिल्यास भारतीय जनता पार्टीला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता  आगामी काळात धुळे नंदुरबार जिल्ह्यात घडणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष केंद्रित केले जात आहे. मात्र विरोधाचे हे लोन जर असेच पसरत राहिले तर मात्र भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांनी संक्रांत येऊ शकते असे मत व्यक्त केले जात आहे. 




 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने