अखिल भारतीय किसान सभेचा अँड. गोवाल पाडवी यांना जाहिर पाठिंबा!



 
अखिल भारतीय किसान सभेचा अँड. गोवाल पाडवी यांना जाहिर पाठिंबा!

शिरपूर  - नंदुरबार लोकसभा मतदार संघात शिरपूर विधान सभा मतदार संघ येत असल्याने.शिरपूर तालुक्यातील मते हे निर्णायक असतात. 2024 च्या या निवडणुकीत शिरपूर तालुकाच खासदार कोण हे ठरवणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांची वैरी असून त्यांनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान करणार आहे.
 
2019 नंतर नरेंद्र मोदीचा नेतृत्वाखाली केंद्र सरकार यानी  कोरोणा काळात कोणत्याही शेतकरी  संघटनेने मागणी केली नसतांना  शेतकरी विरोधात  तीन काळे कायदे केले.त्यामुळे या कायद्याचा विरोधात देशातील शेतकर्याना आदोंलनाचे हत्यार उचलावे लागले.शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त किसान मोर्चाची स्थापना करून  382 दिवस दिल्लीतील चारही बार्डर वर शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी आदोंलनात अनेक शेतकरी शहिद देखिल झाले तरहि नरेंद्र मोदींनी शेतकरी नेत्याशी साधी चर्चा केली नाही.केंद्रीय कृषि मंत्री तोमर यानी अनेक बैठका घेतल्या .तरही तोडगा निघत नाहि म्हणुन संयुक्त किसान मोर्चाने 
संपूर्ण देशात आदोंलनाचे रान पेटवले या आंदोलनातक सहभाग होता.परंतु मोदी सरकार ने तीन काळे कायदे रद्द केले .परंतु दिलेले आश्वासन पाळले नाही.

त्यामुळे आज देखिल पाच मागण्यांबाबत संयुक्त किसान मोर्चा लढा देत आहे.त्यात हमी भावचा कायदा हा देखिल मोदी सरकार ने मान्य करीत नाही.कापसाला भाव मिळाला नाही.
कांदाला भाव मिळाला नाहि .शेतकरी विरोधी धोरण मुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.
भरमसाठ शेतीतील वाढलेला खर्च. मिळणारे उत्पन्न यात ताळमेळ बसत नाहि म्हणुन शेतकरी कर्ज बाजारी होत आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतात.तसेच तरुणांना नोकऱ्या नाहित कामगार विरोधी धोरण राबवित आहेत. म्हणुन हे भा.ज.प.मोदी सरकार शेतकरी,शेतमजूर,कामगार विरोधी सरकार असुन आदणी ,आबांनी,याचा सरकार  आहे.
तसेच खासदार डॉ.हिनाताई गावित यानी दहा वर्षांत वनजमीन कायदेविषयक आदिवासी बांधवांना आज पावेतो वनजमीन चे 7/12देऊ शकले नाहीत. या विषयावर देखिल बोलेले नाहीत. शिरपूर तालुक्यातील साखर कारखाना सुरु करु शकल्या नाहीत. 
या वेळेस भा.ज.प प्रणित एनडीए आघाडी विरोधात इंडीया आघाडी अशी सरळ लढत होत आहे. म्हणुन अखिल भारतीय किसान सभे तर्फै इंडीया आघाडीचे  उमेदवार  अँड गोपाल पाडवी याना जाहिर पाठींबा किसान सभे तर्फै देण्यात येत असुन किसान सभा सक्रिय सहभाग घेऊन. अँड  .गोवाल पाडवीचा प्रचार  करुन भाजप हटाव ,देश बचाव ,सविंथान बचाव !असा प्रचार शिरपूर तालुक्यातील  खेड्यापाड्यात करणार आहे. त्यामुळे नंदुरबार मतदार संघात अखिल भारतीय किसान सभेने अँड. गोवाल पाडवी यांना जाहिर पाठिंबा दिला आहे  अशी माहिती अँड. हिरालाल परदेशी प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने