ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान शिरपूर शहरात गावठी बनावटीचे पिस्टलसह ०१ आरोपी जेरबंद
शिरपूर शोध पथकाची कामगिरी
शिरपूर - शिरपूर शहर शोध पथका कडून दि.२१/०४/२०२४ रोजी ००.०१ ते ०३.०० वाजेपावेतो शिरपूर शहर पो.स्टे. हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन राबविण्याबाबत वरीष्ठांनी आदेश दिले होते. त्यानुसार शिरपूर शहर पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.के. के. पाटील अति.कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर भाग शिरपूर यांनी शिरपूर शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नेमण्यात आले होते.
त्याप्रमाणे पोउनि/गणेश कुटे व पोउनि/संदिप दरवडे तसेच त्यांचे सोबत शोध पथकाचे पोलीस अंमलदार पो.स्टे. रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर, हद्दपार इसम, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असतांना दि.२१/०४/२०२४ रोजी ००.१० वाजेचे सुमारास आमोदे ता. शिरपूर जि. धुळे गावात शासकीय विश्राम गृह समोरील मोकळे मैदान मध्ये अंधारात एक इसम पोलीस गाडी येत असल्याचे पाहून पळुन जातांना दिसल्याने त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून त्यास शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नागेश ऊर्फ सोन्या पंडीत कोळी, वय ३१, रा.आमोदे, ता.शिरपूर जि.धुळे असे असल्याचे सांगितले. त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कमरेजवळ डावे बाजुस राखाडी रंगाचे शर्टाचे आत राखाडी रंगाचे पॅन्टमध्ये गावठी बनावटीचे पिस्टल खोचलेले त्याची मॅगझीन काढून पाहता त्यामध्ये दोन जिवंत काडतूस मिळून आले त्यांचे वर्णन व किंमत खालील प्रमाण १)२५,०००/- रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे स्टीलचे पिस्टल त्यास मुठला काळ्या रंगाचे कव्हर व स्टीलची मॅगझीन असलेले जु.वा.कि.अ.
२) २,००० /- रूपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस किं.अं.
२७,०००/- रूपये किंमतीचे स्टीलचे गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस वरील प्रमाणे ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुस आरोपी नामे नागेश ऊर्फ सोन्या पंडीत कोळी, वय ३१, रा.आमोदे, ता. शिरपूर जि. धुळे हा त्याचे कब्जात गैरकायदेशिररित्या विनापरवाना बाळगतांना मिळून आला म्हणून त्याचेविरूध्द पोकों/गोविद कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार अधिनियम सन १९५९ चे कलम ३ चे उल्लंघन कलम २५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता ०३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे हे करीत आहेत.
वरील आरोपीताविरूध्द यापूर्वी शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ३००/२०२२ भादंवि कलम ४५२.३२३,५०४,५०६, ४२७.३४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन तो गुन्हे करण्यास सरावलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच प्रभारी उप विभागीय पोलीस अधिकारी तथा शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/गणेश कुटे, पोउनि/संदिप दरवडे तसेच डी.बी. पथकाचे पोहेकों/ललीत पाटील, पोहेकों प्रमोद ईशी, पोहेकों/बालमुकुंद दुसाने, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, भटु साळुंखे, मनोज महाजन, सचिन वाघ, आरीफ तडवी, शांतीलाल पावरा, भुपेश गांगुर्डे व चापोकों/ रविंद्र महाले अशांनी मिळून केली आहे.
