धुळे लाचखोर पीआयकडे सापडले 60 लाखांचे सोन्याचे बिस्किट
सव्वा दोन कोटी रुपयांचे घबाड; हद्दपारीची कारवाई टाळण्यासाठी घेतली दीड लाखाची लाच
धुळे - पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर धुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती. आता याच प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
दोंडाईचातील संशयितावर हद्दपारीची कारवाई टाळण्यासाठी दोन लाखांची मागणी करुन दीड लाख लाच घेणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात सुमारे सव्वादोन कोटींचे घबाड सापडले आहे. यात सुमारे ६० लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे व दागिने, ७७ हजार रुपये किमतीचे चांदीची भांडी व दागिन्यांचा समावेश आहे. या शिवाय कुटुंबीय व नातलगांच्या नावाने असलेली सुमारे एक कोटी ७५ लाखांच्या मालमत्तेचे दस्तऐवज सापडले आहेत. त्यांचा एकत्रित आकडा हा सुमारे दोन कोटी ३५ लाखांपर्यंत आहे. ही सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली.
ठरल्यानुसार लाचेची रक्कम घेण्यासाठी हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील हे दोंडाईचाला गेल्यानंतर तडजोडीत दीड लाख रुपये देण्याचे ठरले; परंतु याबाबत आधीच धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करण्यात आली होती. या पथकाने लाच घेताना मोहने व पाटील यांना ताब्यात घेतले. यानंतर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तर पथकाने मिल परिसरात असलेल्या दत्तात्रय शिंदे यांच्या घराची झडती घेतली. त्यांच्या निकटवर्तीयांचीही चौकशी सुरू आहे. संशयित पोलिस कर्मचारी नितीन मोहने व अशोक पाटील यांच्या घराचीदेखील झडती घेण्यात आली असून, या तिघांची पोलिस
मागणी पाच दिवसांची, मिळाली २ दिवस कोठडी मिळाले आहे.
दरम्यान या घटनेमुळे धुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ माजली असून पोलीस खात्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
