होळीची मस्ती ,पण जरा शिस्तीत
होळी व धुलीवंदन सण साजरा करतांना खबरदारी चे शिरपूर पोलिसांचे आवाहन
शिरपूर प्रतिनिधी - शहरात होळी व धुलीवंदन साजरा करताना शहर पोलिसांकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले असून होळीची मस्ती करा पण जरा शिस्तीत असा इशारा वजा सूचना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिल्या आहेत.
शिरपूर शहर व शिरपूर तालुक्यातील सर्व नागरीकांना होळी व धुलीवंदन सणा निमित्त शिरपूर शहर पोलीसांचे वतीने अवाहन करण्यात आले आहे की होळी व धुलीवंदन सण शांततेत साजरा करावा. होळी सणा निमित्त दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे कोणतेही कृत्य उदाहरणार्थ आक्षेपार्ह स्टेटस ठेवणे फोटो, व्हिडीओ व्हायरल करणे, आक्षेपार्ह घोषणा देणे यासारखे कृत्य आपल्या हातुन होता कामा नये. तसेच धुलीवंदन सणाच्या निमित्ताने कोणीही मोटार सायकल ट्रिपल सीट किंवा त्यापेक्षा जास्त सीट बसवून तसेच कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींना बसवुन मद्यार्काचे सेवण करून निष्काळजीपणे व भरधाव वेगाने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून कोणीही वाहने चालवु नये. धुलीवंदन सणाच्या दिवशी कोणीही रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर तसेच वाहनांवरती पिचकारी किंवा फुगे किंवा इतर पध्दतीने कोणाला ईजा होईल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीने कलरयुक्त पाणी फेकू नये ओळखी किंवा अनोळखी महिला, मुली यांच्या अंगावर देखील कोणी कलरयुक्त पाणी फेकु नये किंवा कोणालाही जबरदस्तीने रंग लावण्याचा प्रयत्न करू नये. तसेच खास करून ज्या भागामध्ये शिक्षणा निमित्त बाहेरून आलेल्या विद्यार्थीनी राहतात त्या परिसरात कोणीही गर्दी करून हुल्लडबाजी करू नये. कोणीही परवानगी शिवाय कुठेही डी.जे. किंवा इतर वाद्य वाजवु नये त्याचप्रमाणे आदर्श आचार संहितेचा भंग होईल व सार्वजानिक शांततेचा भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये.
रंगपंचमी सणा निमित्त शिरपूर शहरामध्ये ठिक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील लावण्यात येणार आहे व मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच सार्वजानिक शांततेचा भंग करणाऱ्या ईसमांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सार्वजानिक सण-उत्सव साजरा करतांना आपल्या स्वतःच्या व इतरांच्या आनंदात विर्जन पडणार नाही याची सर्वानी खबरदारी घ्यायची आहे. आपणांस सर्वांना धुळे जिल्हा पोलीसांच्या वतीने व शिरपूर शहर पोलीसांच्या वतीने मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे व सर्व शिरपूर शहर पो.स्टे.चे व शिरपूर शहर उप विभागातील सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा.
