मुलगी झाल्यामुळे सासऱ्यांच्याकडून सुनेचा छळ ! महिला व बाल सहाय्य कक्षाकडे तक्रार दाखल !




मुलगी झाल्यामुळे सासऱ्यांच्याकडून सुनेचा छळ !

महिला व बाल सहाय्य कक्षाकडे तक्रार दाखल !

 

अमळनेरः रुबजी नगर अमळनेर येथिल संजय लोटन भोई यांची मुलगी दिपाली हिचा विवाह दिनांक 19/03/2020 रोजी  सुभाषनगर भोई गल्ली जुने धुळे येथिल आनंदा मडकू साटोटे यांचा मुलगा सागर याच्याशी झालेला आहे. यास कार्तीक नावाचा एक दोन वर्षाचा मुलगा असून दिनांक 28/01/2024  रोजी मुलगी जन्माला आली.  आगोदर पासूनच दिपालीला सासरच्यांकडून छोट्या-मोठ्या कारणांवरुन त्रास दिला जात होताच मात्र मुलगी झाल्यापासून दिपालीला आम्हाला मुलगी नको, मुलगा हवा होता. ह्या कारणानाने तीचा शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू होते,  त्यामुळे दिपालीस दीड महिन्यापासून माहेरी पाठवून दिले होते, व सुनेला सांगितले की तुला मुलगी झाली आहे आमच्या परिवारात मुलगी नको मुलगा हवा असे सांगून सुनेला घरेबाहेर काढून दिले. तर फोनवर वारंवार सुनेला धमक्या देऊन सांगितले की तुझी आई वडिलांकडून जे होईल ते करून टाक.  आमचे काहीच होणार नाही अश्या धमक्या दिल्या जात होत्या.  दिनांक 21 मार्च  रोजी  आनंदा मडकू साटोटे यांचा मुलगा सागर अमळनेर आलेत व गल्लीत उभे राहून गलच्छ अश्या शिवीगाळ करु लागलेत.  मुलीच्या वडिलानांनी  त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता वाप व मुलाने त्यांच्या आगावर धाऊन जात त्याच्यावर  दगडफेक केले. त्यामुळे गल्लीत आरडा-ओरडा पाहून गल्लीतले नागरीक जमा झाले.  सागर चे वडील यांनी गर्दी पाहून बाजूला पळत असताना त्यांच्या पाय शेजारीच असलेली  कपडे सुकविण्याच्या दोरीमध्ये पाय अडकून खाली पडल्याने जवळ पडलेल्या फ़रशीवर डोके आदळले त्यामुळे त्यांच्या डोक्याल्या मार लागला आहे. 

             सारसच्यांकडून मुलगी झाल्यामुळे मुलगी दिपालीचा छळ होत असल्यामुळे व त्यातच आगोदरपासून घरची परिस्थिती जेम-तेम असल्यामुळे त्रासलेल्या वडीलानांनी मुलगी दिपालीला महिला आयोगाकडे तक्रार करण्यास सांगत होते. त्यातच दिपालीच्या नवरा व सारसरे यांनी अमळनेर येथे घरी येऊन गलीच्छ शिवीगाळ व भांणगड केल्याने शेवटी दिपालीने जळगाव येथे जाऊन महिला व बाल सहाय्य कक्षाकडे तक्रार दाखल केली.  

           या तक्रारी नुसार दिपालीचा सासरच्यांकडून मानसिक व शारीरीक त्रास देवून तिचा छळ करीत असत व तिचा आजारपणासाठी कोणताही औषधोपचार करीत नाहीत, तर उपचार करणेसाठी माहेरी हाकलून देत असतात. त्यातच दिपालीला मुलगी झाल्यापासून मानसिक छळ व टोचून बोलून आणि मारझोड करून हाकलून दिले आहे. दिपालीच्या सासरच्याकडून छोट्या मोठ्या कारणाने अतिशय घाणेरडया व गलिच्छ शिवीगाळ  करत आहेत. दिपालीचे सर्व सोन्या-चादीच्या वस्तू मोडतोड करुन टकलेली आहे. दि. 21 मार्च रोजी दिपालीच्या आईवडीलाना अतिशय धोरड्या शिव्या देवून आई वडील यांना लाथा बुक्यांनी क्रुरपणे मारठोक केली. ते कुणाचेही ऐकूण घेण्यास तयार नव्हते व फारकत देऊन टाका, अशी धमकी देत होते.  याबाबत अमळनेर पो.स्टे. येथे तक्रार दाखल केली आहे.

              याबाबत अमळनेर पोलिस तपास करत असून महिला व बाल सहाय्य कक्षाने तक्रार दाखल करुन घेतली असून पुढील कारवाईस सुरुवात केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने