इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे अवैध वेश्या व्यवसाय करणार्या हाॅटेलवर पोलीसांचा छापा.हाॅटेल मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल.
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावचे हद्दीतील हाॅटेल आनंद या ठीकाणी रात्रीच्या वेळी भिगवण पोलीस पथकाने छापा टाकुन तीन महीलांसह संबधीत हाॅटेल मालक व त्यांचे चार साथीदार यांना ताब्यात घेवुन महिलांकडे विचारपुस केली असता सदर हाटेलचा मालक व त्याचे साथीदार हे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आमच्याकडून वेश्यागमन वैश्या वेवसाय करून घेत असल्याची माहीती सदर तीन महिलांनी दिल्याने भिगवण पोलीसांनी हाॅटेल मालकासह त्याचे साथीदार यांचेवर स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केल्याची माहिती भिगवण पोलीसांनी दीली.
नामदेव बाळासो बंडगर वय. ४० वर्षे, रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि.पुणे, व त्याचे साथीदार अमित तानाजी भोकरे, वय.२१ वर्ष, रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे, रोहीत अंकुश निकम, वय २५ वर्ष, रा. उध्दट, ता. इंदापुर, जि.पुणे, गजानन लक्ष्मण ठाकुर, सध्या रा. आनंद हॉटेल, भिगवण,ता.इंदापुर,जि.पुणे, मुळ रा. गंगाखेड, जि परभणी, मुंगाजी उर्फ पिंटु आवरगड,रा.भिगवण,ता.इंदापुर, जि. पुणे, मुळ रा.रूमणा जवळा,ता.गंगाखेड,जि.परभणी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असुन त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असुन दोन आरोपी फरार आहेत.तर अटक आरोपींना इंदापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १२ तारखेपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दीले आहेत.
वरील आरोपी हे हॉटेलमध्ये महीला यांचे मार्फतीने स्वताचे आर्थिक फायद्या करीता वैश्या व्यवसाय करीत असल्याची गोपनिय माहीती पुणे ग्रामिण परिविक्षाधिन सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड व भिगवण पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी भिगवण पोलीसांनी छापा टाकला असता संबधीत हॉटेलमध्ये तिन महीला व वरील आरोपी मिळुन आले.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देखमुख,बारामती उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक संदेश बावकर,रूपेश कदम,युवराज घोडके, दत्तु जाधव, रणजीत मुळीक,अंकुश माने,आप्पा दराडे,नारायण वाळके,डी.एल.
इंगोले,डी.एस.जाधव, महीला पोलीस अंमलदार सारीका जाधव यांचे पथकाने केली असुन पुढील तपास सहा.पोलीस निरिक्षक संदेश बावकर हे करत आहेत.
