जागतिक महिला दिनानिमित्त जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर फाऊडेशन,धुळे तर्फे गुणवंत विध्यार्थी माता सन्मान सोहळा चे यशस्वी आयोजन*




*जागतिक महिला दिनानिमित्त जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर फाऊडेशन,धुळे तर्फे गुणवंत विध्यार्थी माता सन्मान सोहळा चे यशस्वी आयोजन*

धुळे दिनांक 12 :- जागतिक महिला दिवसानिमित्त धुळे येथील सामाजिक संस्था जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर फाउंडेशन धुळे तर्फे व कौटुंबिक न्यायालय धुळे आणि सखी वन स्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी दादासाहेब रावळ शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धुळे या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी माता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात कौटुंबिक न्यायालय धुळे येथील न्यायाधीश माननीय स्वर्णिता बाळासाहेब महाले  या अध्यक्षस्थानी होत्या. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सदर शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथील मा. प्राचार्य डॉ.आर. जी. वाडेकर सर, कौटुंबिक न्यायालय धुळे येथील समुपदेशक अनुराधा खरात मॅडम, सखी वन स्टॉप सेंटर धुळे च्या केंद्र व्यवस्थापक रोहिणी महाजन तसेच शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथील महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रीमती नयना चंद्रकांत बोरसे महिला तक्रार समितीच्या सदस्या माननीय वसुंधरा बोरकर धुळे जिल्हा व सत्र न्यायालय येथील विधीज्ञ अमितजी दुसाने साहेब आधी उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमात शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथील जे गुणवंत विद्यार्थी आपापल्या विभागांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेले होते त्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मातांसह सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक जनाधार सोशल डेव्हलपमेंट वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष अँड.शितल जी जावरे यांनी केले प्रास्ताविक करताना त्यांनी संस्था कार्य करत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली एडवोकेट शितल जावरे म्हणाल्या जनाधार सोशल डेव्हलपमेंट वेल्फेअर फाउंडेशन हे महिला मुलं वृद्ध वंचित या सर्व घटकांसाठी काम करणारी एक सामाजिक संस्था आहे ही संस्था समाजातील तळागाळाच्या वंचित घटकांपर्यंत पोहोचते व त्यांच्यापर्यंत शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करते आणि वेळोवेळी संस्थेतर्फे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग हा आजचा कार्यक्रम आहे आणि आजच्या कार्यक्रमांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे यात विद्यार्थ्यांच्या सोबतच त्यांच्या मातांचाही सन्मान करण्यात येत आहे तर तदनंतर सदर कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण असलेले गुणवंत विद्यार्थी माता सन्मान सोहळ्यातील सत्कारार्थींचा सत्कार माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथींच्या माध्यमाने करण्यात आले. सदर सत्कारानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कौटुंबिक न्यायालय धुळे येथील माननीय न्यायाधीश स्वर्णिताजी महाले यांनी आपले अमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले सदर मार्गदर्शन करताना त्यांनी ह्युमन ट्राफिकिंग या विषयावर प्रकाशझोत टाकला समाजामध्ये ह्यूमन ट्राफिकिंग द्वारे मानवाची तस्करी कशी करण्यात येते याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर सांगितले आणि सदर मानव तस्करी होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने अवेअर झालं पाहिजे व शासनाने चाईल्ड लाईन वुमन हेल्फ लाईन या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत याची प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींनी माहिती ठेवली पाहिजे आणि अडचणीच्या वेळेस त्याचा उपयोग केला पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला. त्यानंतर शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथील विद्यार्थ्यांनी जेंडर इक्वलिटी यावर सुंदर असे पथनाट्य सादर केले व प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले त्यानंतर वन स्टॉप सेंटर येथील माननीय रोहिणी महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सखी वन स्टॉप सेंटर बद्दल उपस्थितांना माहिती दिली त्याचबरोबर विधीज्ञ अमित दुसाने यांनी विद्यार्थ्यांना कायद्यान बद्दल माहिती दिली व अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष नैनाजी बोरसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनाधार सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सदस्य ईश्वर वाघ यांनी केली सदर कार्यक्रमाची सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका पुनमजी बेडसे यांनी केले सदर कार्यक्रमाला आयोजित करण्यात कौटुंबिक न्यायालय धुळे चे कर्मचारी वर्ग तसेच शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धुळे चे संपूर्ण कर्मचारी वृंद आणि जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर फाउंडेशन धुळेचे उपाध्यक्ष प्रविण राठोड सचिव दिनेश पाटोळे खजिनदार सुभाष जावरे सदस्य सिद्धार्थ मंगळे, एडवोकेट शैलेश सोनार, अडवोकेट अतुल जाधव, ईश्वर वाघ आणि एडवोकेट संदीप जावरे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने