शहादा आगारातील वाहकाचा निर्घुनपणे खून करून मृतदेह जाळला....



शहादा आगारातील वाहकाचा निर्घुनपणे खून करून मृतदेह जाळला....

शहादा --
    तीन दिवसांपूर्वी मिसिंग झालेला शहादा बस आगारातील  राजेंद्र उत्तमराव मराठे (५३) या वाहकाची  (कंडक्टर ) काल दि १६ रोजी खून झाल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली  तालुक्यातील  नांदर्डे - तऱ्हावद रस्त्यावर फरशी पुलाच्या खाली घडलेल्या या घटनेत  पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला असून तोंडाचा भाग कुत्र्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर नेल्याने बकरी चालणाऱ्या मुलाच्या निदर्शनात आल्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी  शहादा पोलिसात अज्ञात व्यक्तीन विरोधात कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे  यांनी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनापुढे घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे
    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा बस आगारातील वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे( रा.सदाशिवनगर- शहादा) हे दिनांक 14 रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या मोटरसायकलीने किराणा घेण्यास बाजारात गेले होते मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध करूनही कुठेही आढळून न आल्याने शहादा पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली पोलिसांनीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कुठेही त्यांचा शोध लागला नाही दरम्यान काल दिनांक 16 रोजी रात्री 8:45 वाजेच्या सुमारास नांदर्डे- तऱ्हावद रस्त्यावर फरशी पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाल्याने त्यांना सदर मिसिंग घटनेबाबत शंका आली त्यांनी तात्काळ मिसिंग झालेले राजेंद्र मराठे यांच्या पत्नी मीनाक्षी मुलगा प्रद्यग्न व मुलगी भावना यांना बोलावून घटनास्थळी नेले असता जळीत  मृतदेहाचे अर्धवट जळालेला एक पाय ,कपडे पायाची नखे ,व तोंडाचा काही भाग दाखविला असता तो राजेंद्र मराठे यांच्याच असल्याचे त्यांनी ओळखल्याने त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे तीन दिवसापूर्वी मिसिंग झालेल्या मराठे यांचा निर्गुणपणे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत
    भावना राजेंद्र सरोदे (मराठे) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी स्वतःकडे घेतली आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने