चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी पूर्ण होणार
मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेच्या मागणीला यश.
नाशिक -
मोटर मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे खुप वर्षापासून वेळोवेळी शासनाकडे चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती.या मागणीला यश आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार , उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस यांनी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाचे मोटर मालक कामगार वाहतूक संघटना तसेच महाराष्ट्रतील चालकांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. या मुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या बाबत विजय काकडे
मराठवाडा विभाग प्रमुख ,सचिन जाधव,अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) मोटर मालक कामगार वाहतूक संघटना यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आलेत.
