शहादा मुन्सिपल हायस्कूलच्या इमारतीची दुरुस्ती करा भाजपा उपाध्यक्ष विनोद जैन यांची मागणी*
*शहादा* येथील मुनिसिपल हायस्कूलच्या इमारतीची दुरवस्था झाली असून नवीन इमारतीच्या कामासाठी शासन दरबारी तौरीत पाठपुरा करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन यांनी शहराच्या वतीने शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जुन्या कार्यकर्त्यांनी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडव्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या आशय असा की, शहरातील अतिशय जुनी व स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगरपालिका निरीक्षणाखालील असलेली मुन्सिपल हाय स्कूल ची दुरुस्त झाली आहे. शाळेच्या वरच्या स्वतःचे प्लास्टर केव्हाही खाली कोसळून अपघात होऊ शकतो. या शाळेत अनेक लहान मोठे विद्यार्थी शिकत आहेत. शहाडे चे प्लास्टर काही प्रमाणात खाली पडले आहे. या प्लास्टरची अवस्था बिकट झाली आहे. भविष्यात कुठलेही हानी होऊ नये यासाठी शासनाने त्वरित लक्ष देऊन मुन्सिपल हायस्कूलची नादुरुस्ती इमारत तरी दुरुस्त करून पुढील अपघात टाळावा अशी मागणी करण्यात आल्या यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन. प्रशांत कुलकर्णी जिल्हा सचिव कमलेश जांगिड. भाजपा युवा मोर्चा शहर महामंत्री मयूर बाविस्कर तळोदा नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी आदी उपस्थित होते.
