दोंडाईचा शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स.डे उत्साहात साजरा* दोडाईचा (मुस्तफा शाह)




*दोंडाईचा शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स.डे  उत्साहात साजरा*
दोडाईचा  (मुस्तफा शाह)  

दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स डे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी ९ वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर एका टेलर बांधवांस श्री तुकाराम जगताप यांना कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री तुकाराम जगताप व प्रमुख अतिथी श्री. रतिलाल रामदास शिंपी रा. परिवर्धे ता. शहादा जि. नंदुरबार यांच्या शुभहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची प्रतिमेचे व शिलाई मशिन ची पुजा करण्यात आली.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख  पाहुणे यांच्या दोंडाईचा शहर अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी यांच्या शुभहस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सर्व टेलर बांधवांना कल्याण येथील दानशुर बांधव आर सी कमांन्डर श्री मनिलालभाऊ शिंपी यांच्या आर्थिक मदतीने त्यांचे वडील श्री रतिलाल शिंपी यांचे अमृत महोत्सव निमित्ताने सर्व टेलर बांधवांना कपडे कटींग करत असतांना लागणारी कात्री सप्रेम भेट म्हणुन देण्यात आली तसेच शिवणकाम करून संसारात मदत करणारे महिला भगिनींनी यांच्या सुद्धा यावेळी कात्री देऊन सत्कांर करण्यात आला कार्यक्रमांसाठी दोंडाईचा कर समाज बांधवाचे ही तेवढीच मदत मिळाली.तसेच यावेळी मंध्यवंर्ती संस्थेचे संचालक प्रा.प्रकाश भांडारकर धुळे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बागुल अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी यांनी सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केले व जागतिक टेलर दिवसानिमित्ताने आज होत असलेल्या सत्कांरामुळे शिवणकाम करणारे टेलर बांधव माजी अध्यक्ष श्री हरीदास जगताप आपले मनोगत व्यक्त केले तसेच दोंडाईचा समाज मंगल कार्यालय बांधकामांस ज्या समाज बांधवानी यावेळी देणगी दिली  त्या देणगीदारांच्या सत्कांर करण्यात आला यावेळी जमलेले सर्व  शिवणकर्मी बांधवांना अल्पोपहार देण्यात आला.*
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोंडाईचा अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी, उपाध्यक्ष श्री शरद पवार, सचिव श्री चंद्रकांत कापुरे, सल्लागार प्रा. प्रकाश भांडारकर, धुळे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बागुल, सल्लागार श्री हरिदास जगताप, श्री राजेंद्र गवळे, श्री मधुकर जाधव, मा. उपाध्यक्ष श्री. मनोज मेटकर,श्री नरेन्द्र चित्ते श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, धुळे जिल्हा युवाध्यक्ष श्री विशाल कापडे, मा. युवाध्यक्ष श्री. सतीष जाधव, दोंडाईचा युवाध्यक्ष श्री सागर पवार, युवा उपाध्यक्ष श्री योगेश बोरसे, श्री दिपक पवार, श्री महेंद्र जगताप, श्री. सुनिल जगताप, श्री. सचिन जगताप व धुळे जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ सुरेखा जाधव माजी तालुकाध्यक्ष सौ उषाताई जगताप माजी महिला उपाध्यक्षा सौ. जयश्री पवार  सौ.आशाताई जगताप यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास सर्व समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमांचे उत्कृष्ट सुत्रसंचालन उपाध्यक्ष श्री. शरद पवार यांनी केले तसेच शेवटी आभार प्रदर्शन सचिव श्री चंद्रकांत कापुरे केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने