शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा शिवसेनेचे निवेदन




शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा शिवसेनेचे निवेदन

शहादा :--  राज्य शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासोबत आजपर्यंत खरेदी केलेल्या कापसाच्या प्रकारचे रक्कम व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना अदा करावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांनी प्रांताधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना दिले          निवेदनाचा आशय असा   राज्य शासनाने कापसासाठी हमीभाव हा 7 हजार 70 रुपये असा ठरविला असून यापेक्षा कमी किमतीने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जाहीर केले आहे शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ने परिसरातील व तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी विक्रीसाठी शहादा दोंडाईचा रस्त्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून तेथे परवानाधारक व्यापाऱ्यांकडून लिलाव प्रक्रियेद्वारे कापसाची खरेदी केली जाते या लीलाव प्रक्रियेत हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी कापूस खरेदी करत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे    सोमवारी तालुक्यातील नवनाथ गिरासे या शेतकऱ्याने हमीभावापेक्षा 270 रुपये दराने कापूस खरेदी का केली जात आहे असा जाब व्यापाऱ्याला विचारल्यानंतर संबंधित व्यापारी व त्याच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी अरेरावेची भाषा वापरत त्यांना मारहाण केली ही घटना निंदनीय आहे व्यापारी एकजूट करून कमी दराने कापूस खरेदी करून स्वतःचा आर्थिक फायदा करतात अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने आपण आपल्या पातळीवर या सर्व प्रकाराची निपक्षपाती चौकशी करून कारवाई करावी  कापूस खरेदी केंद्रात आतापर्यंत हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सर्व फरकाची रक्कम ज्या शेतकऱ्यांनी  कापूस विक्री केला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे  देण्यात यावी त्याचप्रमाणे हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य शासनाच्या आदेशान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे त्यांना काळ्या यादी टाकण्यात यावे  येत्या सात दिवसात या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली नाही  तसेच भाव फरकाची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही तर आम्ही या विरोधात जन आंदोलन करू व होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय व बाजार समिती जबाबदार राहील असा इशारा निवेदनात दिला आहे निवेदनावर तालुका प्रमुख राजेद्र लोहार, माजी नगरसेवक विनोद चौधरी गणेश चिञकथे भगवान अलकारी प्रदिप निकुभे मुरली वळवी जयसिंग ठाकरे सुरेश मोरे दिलीप पाटील प्रविण सैदाणे भरत पाटील जुलाल ठाकरे प्रकाश ठाकरे संतोष ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने