*भाजपा नेता सूरज मंडलवर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा: बिरसा फायटर्सची मागणी* *शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल*



*भाजपा नेता सूरज मंडलवर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा: बिरसा फायटर्सची मागणी*

*शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल*

शहादा: आदिवासी बिकाऊ माल है l असे वादग्रस्त वक्तव्य करणा-या बिहारचे भाजप नेते सुरज मंडल यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार  गुन्हा दाखल करून अटक करणेबाबत व त्यांना पदावरून हटवा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्याकडे केली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करन पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


                 निवेदनात म्हटले आहे  की,आदिवासी बिकाऊ माल है l आदिवासी ऑस्ट्रेलिया से आने वाली जनजाती है l आदिवासीयोंने राज्य का खजाना लुटवा दिया l आदिवासी नेता लालची है l असे वादग्रस्त वक्तव्य बिहार राज्यातील भाजप नेते सुरज मंडल यांनी  रांची येथे केले आहे.या वक्तव्याचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.सुरज मंडल यांच्या या बडकाऊ वक्तव्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून सुरज मंडल विरोधात आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे.आदिवासींचा अपमान करणा-या ,आदिवासींना कमी लेखणा-या,आदिवासींच्या भावना दुखावणा-या वादग्रस्त  भाजप नेते सुरज मंडल यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी.तसेच त्यांना भाजप नेते पदावरून तात्काळ हटविण्यात यावे.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने