श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवास आज पासून शिरपूर शहरात सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महा आरती,यात्रेसाठी प्रशासन सज्ज






श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवास आज पासून शिरपूर शहरात सुरुवात
 
मान्यवरांच्या हस्ते महा आरती,यात्रेसाठी प्रशासन सज्ज

शिरपूर महेंद्रसिंह राजपूत -

सुमारे 272 वर्षांपासून ची ऐतिहासिक परंपरा शिरपूर शहराला यात्रेची असून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खंडेराव महाराज मंदिर हे पंचक्रोशीतील भक्तांचे मानाचे व श्रद्धेचे स्थान आहे. या मंदिराबाबत अनेक ऐतिहासिक आख्यायिका असून एक जागृत देवस्थान म्हणून याची ओळख आहे. 


याच पवित्र मंदिराच्या प्रांगणात शिरपूर शहरात पंधरा दिवसांसाठी हा यात्रा उत्सव आज पासून सुरू झाला असून यासाठी व्यापारी आणि प्रशासन सज्ज झाले आहेत.

आज सकाळी नऊ वाजता तालुक्याचे आमदार काशिरामजी पावरा, शहराचे भाग्यविधाते भूपेश भाई पटेल आणि इतर राजकीय सामाजिक आणि प्रशासन आणि खंडेराव बाबा मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी व  मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली.



यानंतर एक कार्यक्रम संपन्न होऊन प्रतिमा पूजन, व पालखीची फीत कापून यात्रा उत्सव सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली.

यावेळेस मान्यवरांनी शिरपूर शहराला असलेली ऐतिहासिक परंपरा मंदिराचे महत्त्व व यात्रा उत्सवासाठी असलेली परंपरा याबाबत माहिती देऊन यात्रेत आलेल्या भाविकांना व व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.



यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवून यात्रा उत्सव अत्यंत शिस्तीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून संपन्न होईल याची ग्वाही दिली.

यात्रेचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार काशीराम पावरा यांनी स्वीकारले होते.
प्रास्ताविक संजय आसापुरे यांनी केले तर सूत्रसंचालन मनोहर पाटील यांनी केले. खंडेराव महाराज यात्रा उत्सव समितीकडून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले.



याप्रसंगी काशिराम दादा पावरा (आमदार शिरपूर),  भुपेशभाई पटेल (मा.उपनगराध्यक्ष शिरपूर),बबनरावजी चौधरी (जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. धुळे) ,डॉ. तुषारजी रंधे (मा. अध्यक्ष : जि.प.धुळे) ,राजगोपलजी भंडारी (उपाध्यक्ष शिरपूर एज्यु. ट्रस्ट), के.डी. पाटील सर (सभापती कृ. उ.बा. समिती, शिरपूर,  किशोरजी माळी (तालुका अध्यक्ष भा.ज.पा. शिरपूर), अरुण धोबी (जिल्हा सरचिटणीस : भा.ज.पा.धुळे) , हेमंत पाटील (मा. नगरसेवक, शिरपूर) ,राजेंद्र राजपुत (मा. नगरसेवक, शिरपूर),  चिंतनभाई पटेल (शहराध्यक्ष भा.ज.पा. शिरपूर , मनुदादा पाटील (मा. नगरसेवक, शिरपूर) ,दिलीप लोहार (ज्येष्ठ नेते भा.ज.पा.) , सुभाष कुलकर्णी (संपादक: राष्ट्रउदय),योगेश भंडारी (चेअरमन पिपल्स् बँक, शिरपूर) ,सुरेश बागुल (मा. नगरसेवक शिरपूर) मांडलीक साहेब (प्रांतअधिकारी, शिरपूर) 
सचिन हिरे साहेब (डी. वाय.एस.पी., शिरपूर) , महेंद्र माळी साहेब (तहसिलदार, शिरपूर) ,के.के. पाटील साहेब (पोलिस निरीक्षक : शिरपूर),  डी.एन. पाटील साहेब (मुख्य अभियंता ग्रमिण)  बढे  (शहर अभियंता विज वितरण कंपनी)  माधवराव पाटील साहेब (मुख्यभियंता न.पा. शिरपूर) , राहुल रंधे (उपसरपंच बोराडी),  रजेसिंग राजपुत (जिल्हा नेते शिवसेना) ,  भरतसिंग राजपुत (उपजिल्हा प्रमुख शिवसेना),   मनोज धनगर (शहराध्यक्ष शिवसेना, शिरपूर),  मनोज महाजन (चेअरमन मर्चेंट बँक, शिरपूर)  रामदास पुरी (उपाध्यक्ष: मर्चेंट बँक, शिरपूर) , संजय चौधरी (संचालक: पिपल्स् बँक, शिरपूर) , सौ. संगिताताई देवरे (मा. नगराध्यक्षा: शिरपूर) संजय हसवाणी (प्रशासकीय अधिकारी, न.पा. शिरपूर) ,अशोक कलाल (चेअरमन विद्याविहार हौ. सोसा) हिंमतराव माळी (अध्यक्ष: मंडी युनियन, शिरपूर),संदिप शालिक देवेर (संचालक मर्चेंट बँक, शिरपूर)  नितीन गिरासे (सामाजिक कार्यकर्ते, शिरपूर) रविंद्र (पिंटू माळी) (ता. अध्यक्ष समता परीषद), राजू सोनवणे सामाजिक कार्यकर्ता यासह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने