*एचपीटी,आर वाय के महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*.
एचपीटी आर वाय के महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी एचपीटी आर वाय के महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. मृणालिनी देशपांडे तर प्रमुख पाहुणे गंगापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.नरेंद्र बैसाणे होते.
या स्नेहसंमेलनात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली तर मा. प्राचार्या, मा. उपप्राचार्य, मा. प्रमुख पाहुणे नरेंद्र बैसाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगापूर पोलीस स्टेशन यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या स्टेजचे नारळ वाढवून पूजन करण्यात आले.त्यानंतर नरेंद्र बैसाणे यांनी थोडक्यात पोलीस व विद्यार्थी यांच्या मधील सदभावना सांगत विद्यार्थ्यांना पुढील कला सादर करण्यास शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्या कला सादर करत सर्वांचे मन भारावून टाकले. तदनंतर प्रमुख पाहुणे मा. नरेंद्र बैसाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना शॉल व ट्रॉफी देऊन टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलनात एचपीटीआरवायके महाविद्यालयाच्या प्राचार्या मृणालिनी देशपांडे ,उपप्राचार्य पी एस देशपांडे, उपप्रचार्य चौरसिया आयक्युएसीचे प्रणव रत्नपारखी तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी विद्यार्थिनी आवर्जून उपस्थित होते.
एचपीटी आरवायके प्राचार्या मा. मृणालिनी देशपांडे यांनी वेग-वेगळ्या कला सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांचे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
