जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणारे ४ आरोपी जेरबंद व १ विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
शिरपूर शहर पो.स्टे. थे डी. बी. पथकाची कामगिरी
शिरपूर - युवकावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणारे ४ आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात शिरपूर शहर पो.स्टे. च्या डी. बी. पथकाला यश आले आहे.
दिनांक ०७/०२/२०२४ रोजी रात्री १०.४५ वाजेचे सुमारास शिरपूर जि. धुळे शहरातील खंडेराव मंदिर जवळ भाजी मार्केटमध्ये काही इसम एका इसमास तलवार, लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करीत असल्याबाबत मिळालेल्या माहिती वरून तात्काळ शिरपूर शहर या स्टे. चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदार अशांनी घटनास्थळी धाव घेतली असता मारहाण करणारे इसम तेथून पळून गले सदर वेळी इसम नामे सुरज जितेंद्र जाधव वय २५ रा. लक्ष्मीनारायण नगर, शिरपूर जि.धुळे हा जखमी अवस्थेत पडलेला असल्याने त्यास तात्काळ कटिज हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. त्याने फिर्याद दिली की, त्यास १) विष्णु रविद्र साबळे, २) विशाल पवार, ३) पृथ्वीराज कोळी, ४) बादल मनोज पवार व ५) बादल सिताराम पवार सर्व रा. आमोदे ता. शिरपुर जि. धुळे अशांनी मिळून काही कारण नसतांना त्याचेवर तलवार, लोखंडी रॉड व काठीने हल्ला चढवून त्यास विष्णु रविंद्र साबळे याने तलवारीने व विशाल पवार याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने तसेच बादल सिताराम पवार, बादल मनोज पवार व पृथ्वीराज कोळी अशांनी मिळून हाताबुक्क्यांनी व लाथांनी जिवे ठार मारण्याच्या हेतूने जबर मारहाण केरले बाबत शिरपूर शहर पो.स्टे. त्या वरील इसमांविरुध्द भादवि कलम ३०७, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८.१४९५०८ साह म.पो. अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास psi /रोशन निकम हे करीत आहेत.
वरील घटनेच्या अनुषंगाने शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदार मारहाण करणारे इसमांचा शोध घेत असतांना सदर इसम हे मांडळ रोडवरील हॉटेल साहेबाजवळ पान टपरीचे आडोशाला मोटार सायकल लावून उभे असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्याने त्यांचा शोध घेणेसाठी तेथे गेले असता त्यांना पान टपरीचे आडोशास ५ इसम २ मोटार सायकलजवळ उभे असल्याचे दिसन्न त्यानी सदर इसमांना आम्ही पोलीस आहोत तेथेच थांबा असे बोलत असतांना व त्यांना पकडण्यासाठी पोकों/गोविंदराव सुरेश कोळी हे गेले असता त्यांना सदर इसमांनी पकडून हाताबुक्क्यांनी मारहाण केली त्यातील काळ्या रंगाचे शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला बादल मनोज पवार पाने त्याचे हातातील लोखंडी रॉडने डोक्यावर वार करीत असतांना तो वार चुकविण्यासाठी पोकों/गोविद कोळी यांनी त्यांचा डावा हात आडवा कला असता त्यांचे डावे हातावर जोराने बार लागून जबर मार लागून जबर दुखापत झाली, त्यावेळी इसम नामे १) विष्णु रविंद्र साबळ २) चादल सिताराम पवार यांना जागीच ताब्यात घेण्यात आले तसेच पळून गेलेल्या इसमांपैकी लोखंडी रॉडने मारहाण करणा-या इसमाचे नाव ३। बादल मनोज पवार व त्याचे सोबत पळून गेलेल्या इसमांची नावे-४) विशाल संजय पवार व ५) राज पृथ्वीराज कोळी सर्व रा. आमोद ना. शिरपूर जि. धुळे असे असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत पोकों/१५६४ गोविंदराव सुरेश कोळी यांनी फिर्याद दिल्याने ३५३,३३२,३३३,९४३,१४७. १४८.१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोउनि हेमंत खैरनार हे करीत आहेत. वरील दोन्ही गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व शोध पथकाचे अंमलदार यांनी शोध मोहिम राबवून आरोपी नाम विशाल संजय पवार यास आमोदे गावातून आरोपी नामे बादल मनोज पवार यास शिंदखेडा येथून तसेच विधीसंघर्षग्रस्त बालक यास आमोद गावातून
शिताफीने ताब्यात घेतले आहे.
वरील गंभीर गुन्ह्यात आरोपी नामे-२) विष्णु रविंद्र साबळे, २) बादल सिताराम पवार, ३) बादल मनाज पवार व ४) विशाल संजय पवार सर्व रा. आमोदे ता. शिरपूर जि. धुळे यांना अटक करण्यात आली असून विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेवुन उल्लखनीय कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पालोस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील, पो.उप नि हेमंत खैरनार, गणेश कुटे, संदिप दरवडे, रोशन निकम तसेच डी. बी. पथकाचे पोहेकों/ललीत पाटील, पोना रविंद्र आखडमल, पोकों गोविंदराव कोळी, योगेश दाभाडे, विनाद आखडमल, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटु साळुंके, सचिन वाघ, मनोज महाजन, आरीफ तडवी, चापोकों विजय पाटील अशांनी मिळून केली आहे.
