११ वर्षापासुन खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपीतास शिताफीने केले जेरबंद




 ११ वर्षापासुन खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपीतास शिताफीने केले जेरबंद 

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील अकरा वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गोपनीय पथकास यश आले आहे.

याबाबत वृत्त असे की शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं.१७५/२०१३ भादंवि कलम ३०२.३२३.५०४,५०६ प्रमाणे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील सुमारे ११ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे नाना ऊर्फ तुकाराम नारसिंग भिल बय ३३ रा. जातोडा ता. शिरपूर जि. धुळे हा पूर्वी वरझडी गावात राहत होता, परंतु तो गुन्हा केल्यानंतर तो त्याची ओळख लपवित गावोगाव भटकत जातोडा गावात राहत असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरून शिरपूर शहर पो.स्टे. चे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी दिनांक २०/०२/२०२४ रोजी जातोडा गावात पाठवून सदर आरोपीताचा शोध घेवुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन जेरबंद करून उल्लेखनीय कार्मागरी केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. च पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खेरणार तसेच डी. बी. पथकाचे पोहेकों/ललीत पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मनोज महाजन, मनोज दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटु साळुंके, सचिन वाघ, आरीफ तडवी तसेच चापोकां/रविंद्र महाले होमगार्ड चेतन भावसार, शरद पारधी, राम भिल व गोपाल अहिरे अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने