अवैध दारुविक्री करणा-यांविरुध्द् स्थानिक गुन्हे शाखा व दारुबंदी विभागाची धडक कारवाई..!!
नंदुरबार जिल्हयाचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त.एस यांनी जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासून सातत्याने अवैध धंदयाविरुध्द सुरु केलेले कारवाईचे सत्र हे आगामी काळातील लोकसभा निवडणुकांचे अनुषंगाने देखील महत्वाचे ठरत आहे. त्यासाठीच अवैधरीत्या दारुची विक्री व वाहतूकीविरुध्द् जिल्हा पोलीस दलाने धडक मोहिम हाती घेतलेली आहे. व त्याबाबतच्या सक्त सुचना देऊन कारवाईत सातत्य ठेवणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस यांनी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व दारुबंदी विभाग यांनी संयुक्त कारवाई दरम्यान नंदुरबार शहरातील विविध ठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाचे विविध कलमान्वये बीयर शॉप विक्रेत्यांवर अवैधरित्या परवानगी नसलेल्या देशी विदेशी दारु विक्री करतांना मिळून आल्याने त्यांचेवर कारवाई केली आहे. त्यामध्ये दिनांक 21/02/2024 रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा व दारुबंदी विभागाकडुन अचानकपणे मोहिम राबवून एकुण 1,04,595/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 1) कल्पेश रविंद्र कासार वय -31 वर्षे, रा.श्रीराम चौक, देसाईपुरा, नंदुरबार 2) चेतन रमेश चौधरी वय- 38 वर्षे रा. देसाईपुरा, नंदुरबार 3) हेमंत दिलीप मराठे वय- 41, रा.पेडकाई नगर, नंदुरबार 4) अर्जुन प्रकाश राजपूत रा.हिंगलाज माता नगर, नंदुरबार यांचेविरुध्द् शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
