विरोधकांनी जातीवादाचे विष पेरले आणि काहीजण त्याला फसले- आमदार दत्ता भरणे
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे 22 कोटी 76 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटने पार पडली. यावेळी लोणी देवकर येथे जाहीर सभेचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
या जाहीर सभेचे प्रस्ताविक संदेश देवकर यांनी केले. सभेच्या सुरुवातीलाच पक्ष प्रवेश घेण्यात आले. यामध्ये शरद देवकर ,संजय देवकर, अनिल देवकर, तुषार देवकर, अंकुश थोरात ,चंद्रकांत थोरात, बाळासाहेब घाडगे, तात्यासाहेब घाडगे ,नवनाथ राखुंडे ,दत्तू राखुंडे, अण्णा कुंभार, सहदेव डोंगरे, बापू डोंगरे ,राजेंद्र डोंगरे ,विशाल गायकवाड, उस्मान तांबोळी, अब्दुल तांबोळी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी स्वागत केले.
ग्रामस्थांच्या वतीने अँड अवधूत डोंगरे व शरद देवकर यांनी गावातील समस्या मांडल्या वस्ती सोडण्याची मागणी केली.
तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,प्रशांत गलांडे पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
या जाहीर सभेत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की लोणी देवकर गावाला मी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. परंतु विरोधकांनी लोणी गावात गैरसमज निर्माण केले व जातीवादाचे विष पेरले त्याला लोणी गावचे काही ग्रामस्थ फसले व मला कमी मतदान झाले अशी चूक पुन्हा करू नका असे आव्हान दत्तात्रय भरणे यांनी केले . लोणी गावासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे देखील ते म्हणाले.
या सभेसाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष अतुल झगडे , संदेश देवकर, सचिन सपकळ, दीपक जाधव ,सतीश पांढरे ,बाळासाहेब काळे, शुभम निंबाळकर, विजय चोरमले ,हमा पाटील ,मेघराज कुचेकर ,संग्राम देशमुख ,सचिन खामगळ बाळासाहेब जगताप व इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

