ओबीसी बहुजनांनी राजकीय परिवर्तनाच्या लढाईसाठी सज्ज रहावे
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचे आवाहन
ॲड प्रियदर्शनी कोकरे यांनी मुंबई येथे घेतली भेट
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :- महाराष्ट्रात ओबीसी बहुजनाच्या 70 ते 80% लोकांसाठी आम्ही लढाई लढतोय सतेच्या जोरावर ओबिसींचा हक्क हिरावून घेतला जात आहे म्हणून आम्ही ओबीसी बहुजन समाजाच्या सन्मानासाठी व त्यांना राजकीय भागीदारी मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य वंचित घटकांना बरोबर घेऊन" जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी" अशी घोषणा देऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी, भटके विमुक्त, बहुजनांना मुख्य प्रवात आणायचे आहे, म्हणून सर्व ओबीसी बहुजनांनी परिवर्तनाच्या लढाई मध्ये साथ द्यावी असे आवाहन ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले.
मुंबई येथे सामाजिक कार्यकर्त्या ॲड प्रियदर्शनी कोकरे, बापूराव सोलनकर यांनी प्रकाश शेंडगे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी हिंगोली जिल्ह्याचे नेते सचिन नाईक, हरिभाऊ शेळके यांच्या सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
