खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीस अवघ्या 9 तासात पकडले.
शिरपूर -शिरपुर तालुका पोलीस ठाणे हददीतील फत्तेपुर- मांजणीपाडा रोड लगत असलेल्या सक-यापाडा फत्तेपुर, फॉरेस्ट येथे नंदा डेडया पावरा रा. सक-यापाडा, फत्तेपुर, फॉरेस्ट ता. शिरपुर जि. धुळे याने त्याची पत्नी मसालीबाई नंदा पावरा वय 55 वर्षे रा.सक-यापाडा, फत्तेपुर, फॉरेस्ट ता. शिरपुर जि.धुळे हिचा दिनांक 11/02/2024 रोजीचे रात्री ते दिनांक 12/02/2024 रोजीचे सकाळी 08.00 वाजे दरम्यान निर्पुण हत्या करुन आरोपी नंदा पावरा हा घटनास्थळावरुन पसार झाला होता. त्याचा मुलगा संजय नंदा पावरा याने खुनाची फिर्याद दिल्यावरुन शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे यांच्या सुचनांप्रमाणे व प्रभारी अधिकारी श्रीराम पवार यांचे मार्गदर्शनाखाली एक शोध पथक तयार करण्यात आले होते. त्यात असई रफिक मुल्ला, पोहेकॉ/84 संतोष पाटील, पोहेकॉ, संजय चव्हाण, पोना0मोहन पाटील, पोकों 135 रणजित वळवी, पोकों,कृष्णा पावरा, पोकों शिवाजी वसावे या पथकाने वाडी शिवारातील जंगलात लपलेल्या आरोपीची गोपनीय माहिती काढून त्यास गुन्हयाचे तपास कामी ताब्यात घेतले व पोलीस ठाणे येथे आणुन गुन्हयासंबंधी विचारपुस केली असता कौटुंबिक वादातुन खुन केल्याची कबुली दिली आहे. म्हणुन त्याला अटक करुन शिरपुर न्यायालयात हजर केले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर विभाग शिरपुर सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, तसेच पोलीस उप निरीक्षक प्रदीप सोनवणे, असई रफिक मुल्ला, पोहेकॉ जगदीश मोरे, पोहेकॉ संतोष पाटील, पोहेको संजय चव्हाण, पोहेको संदीप ठाकरे पोना मोहन पाटील, पोकों रणजित वळवी, पोकों कृष्णा पावरा, पोकों शिवाजी वसावे यांनी केली आहे.
