18 ते 19 वयोगाटासाठी नवमतदार नोंदणी विशेष मोहिम




18 ते 19 वयोगाटासाठी नवमतदार नोंदणी विशेष मोहिम 

शिरपूर - शिरपुर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत तहसील कार्यालय शिरपुर व् इन्स्टिटूट ऑफ मैनेजमेंट शिरपुर यांच्या सयुक्त विद्यमाने शिरपुर येथे नव मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

त्याप्रसंगी 18 ते 19 वयोगटातील विद्यार्थी यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाइन फॉर्म BLO यांचे मार्फत भरण्यात आले आहेत 
तसेच यावेळेस विद्यार्थी याना मतदानाबत तसेच मतदार जागृति बाबत मार्गदर्शन महेंद्र माळी तहसीलदार शिरपुर यांनी केले आहे . युवा मतदारांनी जागृतपणे आपले मतदान यादीत नाव समाविष्ट करावे असे आवाहन केले.

तसेच भरत चौधरी यानी विद्यार्थी यांना वोटर हेल्पलाइन या ऐप बाबत सविस्तर माहिती दिली 
मनोहर चौधरी शिक्षक यांनी मतदार जागृति बाबत विशेष गीत सादर करुन उपस्थित सर्वाची मने जिंकली .

सदर मतदार नोंदणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ वैशाली पाटिल , प्राचार्य , मनोज पटेल सर , कुमावत नायब तहसीलदार यांनी प्रयत्न केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने