दोडाईचा वाहतूक चालक-मालक संघटना,कडून हिट अँण्ड रन कायद्याचा निषेधार्थ
अप्पर तहसीलदारांना व दोडाईचा पोलीस स्टेशनला निवेदन
दोडाईचा अख्तर शाह
नविन वाहन कायदा हिट अँण्ड रन कायदा विरुध्द आम्ही निषेध
दि११/१/२४ तारखेला म्हणून बंद ठेवण्यात आला
आम्ही वाहनचालक आपणास निवेदन करितो की, भारत सरकारने हिट अँण्ड रन कायदा लागू केला आहे. तो आम्हाला मान्य नसुन आम्ही त्याचा निषेध करित आहोत. कारण मोटर वाहन कायद्यामध्ये चालकासाठी अनेक जाचक कायदे आहेत. त्याची कुठलीही सुनवाई न होता हा नविन कायदा हिट अँण्ड रन कायदा आमच्यावर लादण्यात आला आहे. त्या बद्दल चालक संघटनांना विश्वासात घेतले गेलेले नाही किंवा आमच्याशी चर्चा केली नाही. आणि संसदेमध्ये हा कायदा पास करण्यात आला आहे. हा कायदा लागू झाल्यास चालकांना तो जाचक ठरणार आहे. कारण ड्रायव्हर यांना सहा ते सात हजार पगार असतो त्याच्या तो त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो आणि त्याच्या जवळ सात लाख रुपये जमा करणे शक्य नाही. तसेच चालक हा घर प्रमुख असतो घरचालक असल्यामुळे त्याच्या घर परिवार चालवावे लागते जर त्याला दहा वर्षाची शिक्षा होणार आहे. असे झाले तर दहा वर्षाचा त्याचा परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल म्हणून चालक लोकांनी आपले वाहन मालकाकडे सोपवून वाहन न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आम्ही हा कायदाचा निषेध करत आहो म्हणून बंद मध्ये शामिल होता आहेत. जो पर्यंत कायदे हिट अँण्ड रन कायद्याचा निषेध करत हा कायदा जो पर्यंत बंद होत नाही तो पर्यंत आमचा लढा शांततेत सुरु राहिल. म्हणून शासनाला विनंती आहे कि, हा कायदा रद्द करुन आम्हाला न्याय द्यावा हि विनंती.
