लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने सेक्टर ऑफिर व पोलीस सेक्टर ऑफिसर यांची संयुक्त् बैठक
शिरपूर - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दि.10/01/2024 रोजी सेक्टर ऑफिर व पोलीस सेक्टर ऑफिसर यांची संयुक्त् बैठक तहसिल कार्यालय शिरपूर येथे ठिक 11.00 वाजता घेण्यात आली.
सदर बैठकीस मा. पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर श्री. सचिन हिरे व मा.तहसिलदार शिरपूर श्री.महेंद्र माळी व म.निवडणूक नायब तहसिलदार श्री.रविंद्र कुमावत व श्रीमती. शुभांगी चव्हाण, श्री. आर.सी.राठोड, श्री.मकसुद शेख, सचिन ढोले इतर कर्मचारी हजर होते.
सदर बैठकीस Vulnerability Mapping बाबत सविस्तर माहिती तसेच त्या दृष्टीने येणाऱ्या लोकसभा व् विधानसभा निवडणूक वेळेस मतदाराना निर्भयपणे व मुक्त वातावरणात मतदान करता यावे तसेच मतदानाची टक्केवारी वाढवावी या दृष्टीने प्रयत्न करावेत असे तहसिलदार शिरपूर महेंद्र माळी व पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर सचिन हिरे मार्गदर्शन करताना माहिती यांनी दिली.
तसेच प्रत्येक सेक्टर ऑफिसर व पोलीस सेक्टर ऑफिसर यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन केंद्राची पाहणी करुन व गावातील मागील किंवा सध्या गावात घडत असलेल्या गुन्हयाबाबतची चौकशी करुन तशी माहिती विहित नमुन्यात सादर करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत
