*दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघात समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांचा श्रीमंत सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते सत्कार आणि सन्मान सोहळा संपन्न.*
*वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर*
*दोंडाईचा येथील दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघाचा ३९ वा वर्धापन दिन संस्थेच्या ताईसाहेब जमादार सभागृहात दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी साजरा करण्यात आला. सदर सोहळ्याचा कार्यक्रम दोंडाईचा येथील विकासरत्न तथा दोंडाईचा संस्थानचे अधिपती श्रीमंत सरकारसाहेब रावल यांच्या अध्यक्षतेत आणि दोंडाईचा येथील व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमान के. एम. अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.*
*सदर कार्यक्रमात दोंडाईचा शहरातील समाजसेवा क्षेत्रात निस्वार्थ भावनेने समाजातील विविध घटकांना विविध प्रकारच्या सेवा देणारे आदरणीय डॉ. मुकुंद प्रभाकर सोहनी, श्रीमान हुसेनभाई विरदेलवाला, श्री. अब्बासभाई कलमुवाले, श्री. अमरदास कुकरेजा गुरुजी, या चार मान्यवर समाजसेवकांचा संस्थेच्या वतीने विकासरत्न तथा श्रीमंत सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते मानपत्र शॉल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.*
*संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर वार्षिक अहवाल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. पी. गिरासे यांनी सादर केला.*
*सत्कारार्थी बंधूंनी आपल्या मनोगतात संस्थेचे कामकाज आणि संस्था ज्येष्ठांसाठी राबवत असलेले उपक्रम आणि कार्यक्रमा संदर्भात गौरवद्गार काढले.*
*सत्कारार्थी आदरणीय डॉ. मुकुंद सोहनी यांनी संस्थेला पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली. तर इतर सत्कारार्थींनी संस्थेला यथाशक्ती वस्तू स्वरूपात मदत देण्याचे आश्वासन दिले.*
*संस्थेचे निष्ठावान, कर्तव्यदक्ष, कार्यकुशल विद्यमान अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. पी. गिरासे यांना श्रीमंत सरकार साहेब रावल यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.*
*संस्थेच्या ताईसाहेब जमादार सभागृह परिसरात सरकारसाहेब रावल यांच्या संकल्पनेतून उभारलेले ज्येष्ठांचे उद्यानात वृक्ष आणि फुल झाडांची विशेष देखभाल व संगोपन करणारे संस्थेचे निष्ठावंत अस्थाई कर्मचारी श्री. छोटू सोनार तसेच सरकार साहेब रावल आणि प्रमुख अतिथी यांना कार्यक्रमाच्या मुख्य गेट पासून थेट कार्यक्रमाच्या व्यासपीठा पर्यंत संचालनाद्वारे लष्करी थाटात सन्मानपूर्वक पोहोचवणारा छोटू जवान चि. दिप चौधरी याचा सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते सत्कार आणि सन्मान करण्यात आला.*
*अध्यक्षीय मनोगतात विकासरत्न सरकारसाहेब रावलांनी जेष्ठांचे जीवन कसे आनंदमय करता येईल.? या संदर्भात विविध दृष्टांतांद्वारे बहुमोल मार्गदर्शन केले.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री.सुरेश डी. पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.पी. गिरासे यांनी केले. सत्कार्थींचा परिचय कोषाध्यक्ष सुरेश एन. चौधरी यांनी करून दिला. मानपत्रांचे वाचन संस्थेच्या कार्यकारारणीच्या सदस्या सौ. शकुंतलाताई बागल यांनी केले. तर कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन कार्यकारिणीचे सदस्य के.पी. गिरासे यांनी केले. राष्ट्रगिता नंतर कार्यक्रमाची समाप्ती झाली.*
