पुनर्वसित देवी गावाच्या पाणीटंचाई विषयी पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची भेट.
दोडाईचा प्रतिनिधी
दिनांक 27 जानेवारी रोजी अमळनेर येथे महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मदत मंत्री मा. नामदार श्री अनिल पाटील साहेब यांच्याशी मतदारसंघातील पुनर्वसित मौजे देवी गावातील पिण्याच्या पाणी टंचाई प्रश्न संदर्भात व गावात नवीन पाईपलाईन नवीन विहीर मंजुरी करण्यासंदर्भात तसेच पुनर्वसनाचे बजेटमधील न झालेल्या कामांची चौकशी संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे सह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माजी सरपंच चिंधा नाना विद्यमान सरपंच कोमलसिंग भाऊसाहेब त्यांच्यासोबत गावातील उपसरपंच हिरामण पवार भूरा भील आणि त्यांच्यासोबत तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे दीपक जगताप आणि सामाजिक न्यायाचे तालुका अध्यक्ष हर्षदीप वेंदे यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी या देवी गावाच्या महत्वपूर्ण प्रश्न साठी पाठपुरावा केला व मा. मंत्री साहेब यांनी आश्वासित केले की लवकरात लवकर आपला प्रश्न मार्गी लागेल व मी या विषयावर समिती गठित करून त्याची बैठक लावतो यासाठी पुढील पाठपुरासंदर्भात संबंधित अधिकारी यांची चर्चा करून योग्य ती दखल घेतली जाणार...
