दरोडा टाकून प्रसार होणारे चोरटे मुद्देमाला सह अटक, शिरपूर शहर पथकाची कामगिरी
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून कारवाई करत सराईत गुन्हेगार दरोडा टाकून प्रसार होण्याच्या मार्गावर असताना व शिरपूर शहरात देखील दरोडा टाकण्याच्या उद्देशाने प्रवेश करत असतानाच शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय पथकाने दरोडा टाकून प्रसार होणाऱ्या पाच चोरट्यांना मुद्देमालासह अटक करून गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शहरावरील मोठे अनिष्ट संकट टाळलं आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सराफ दुकनात दरोडा टाकून मालट्रक मध्ये बसून मध्यप्रदेशात जाणाऱ्या संशयितांना शिरपूर शहर पोलिसांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पकडले. त्यांच्या ताब्यातून बनवाट पिस्तूल, चांदीच्या वस्तूंसह ३२ लाख ९६ हजार २८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे काल दि १८ रोजी अशोका अँड सन्य या सराफ दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर तासगाव पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असतांना चोरी केल्यानंतर संशयित मालट्रक मध्ये बसून मध्यप्रदेशच्या दिशेने निघाल्याचे समजल्यानंतर याबाबत शिरपूर शहर पोलिसांना माहिती मिळाली होती. शिरपूर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चौकशी सुरु केली असता शिरपूर टोलनाका जवळील मिनी नेस्ट हॉटेल येथे मालट्रक आर.जे.११/जी.सी. ५००१ हे वाहन अंधारात संशयास्पद उभे असल्याचे दिसले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता तेथे मोहित धिरजसिंग परीहार वय २५-रा. बारोल, मध्यप्रदेश, राज भरत परीहार वय 22 शिवपुरी मध्यप्रदेश, जितु सुलतान कुशवाह वय २१-रा. खेडागाव मध्यप्रदेश, अमित परीहार वय २४-सिहोली मध्यप्रदेश, राजिव प्रेमसिंग परीहार वय २४ शिवपुरी मध्यप्रदेश हे मिळुन आले. मालट्रक मध्ये तपासणी केली असता गावठी बनावटीचा पिस्तूल, लोखंडी कटर, लोखंडी टॅमी, व स्क्रू ड्रायव्हर तसेच चांदीचे दागिने मिळुन आले. पोलिसांनी चांदीच्या दांगिने व मालट्रकसह ३२ लाख ९६ हजार २८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक ए.एस.आगकर, उपनिरीक्षक हेमंत खैरणार, संदिप दरवडे, गणेश कुटे, छाया पाटील, व शोध पथकाचे ललित पाटील, रवींद्र अखडमल, गिलीष भदाणे, शाम पवार, मनोज महाजन, विनोद अखडमल, गोवींद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटु साळुंखे, सचिन वाघ, अरिफ तडवी, प्रभाकर भिल, विजय पाटील आदींनी कारवाई केली आहे.

