*दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदे तर्फे शहरात महास्वच्छता अभियान व स्वच्छतीर्थ अभियान*
दोडाईचा मुस्तफा शाह
महास्वच्छता अभियान व स्वच्छतीर्थ अभियान अंतर्गत दोंडाईचा शहरातील धार्मिक स्थळे, मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे. शहारातील श्री संतोषी माता मंदिरापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली असून त्यानंतर श्रीराम मंदिर,नीलकंठेश्वर महादेव मंदिर,गणपती मंदिर,शिवालय मंदीर,खंडेराव मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिदे यांनी राज्यातील स्थानिक :स्वराज्य संस्थांना शहरातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिर परिसर स्वच्छता करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.देवेंद्रसिंग परदेशी यांच्या आदेशानुसार शहरामध्ये दि. १६ ते २३ जानेवारीदरम्यान आठवड्याभरात सर्व १२ प्रभागांमध्ये कृती आराखद्या प्रमाणे महास्वच्छता अभियान,स्वच्छतीर्थ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार दोन दिवसापासून दोंडाईचा शहरातील मंदिर व तीर्थक्षेत्र परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील काटेरी झाडे, झुडपे, गवत व दुभाजकमधील माती गोळा करण्यात येत आहे. शहरातील भितींचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी चिटकलेले पोस्टर, बॅनर काढण्यात आले. महास्वच्छता अभियानात संपूर्ण दोंडाईचा शहरामध्ये मोहीम राबविण्यात येत आहे, नियंत्रण अधिकारी म्हणून श्री.संतोष माणिक,शहर समन्वयक श्री.पंकज पाटील हे काम पाहत आहेत. मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री.शरद महाजन यांना नोडल अधिकारी तर त्यांच्या अधिपत्याखाली ४ झोनमध्ये सहा.मुकादम स्वच्छता श्री.रघुनाथ बैसाणे,श्री.संतोष म्हसदे,श्री.आकाश कांबळे,श्री.गुलाब नगराळे,श्री.नलिन सोलंकी,श्री.दगडू वानखडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन दिवसाच्या मोहिमेत ९ टन कचरा संकलित करण्यात आलेला आहे.मुख्याधिकारी श्री. देवेंद्रसिंग परदेशी,उपमुख्याधिकारी श्री.संदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहेत.तसेच या अभियानासाठी शहरातील नागरिक यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत असून अमरावती नदी पात्रातील नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथील मंदिर समिती सदस्य संजय पवार,महेंद्र कोळी,रामभाऊ ठाकूर,अशोक भावसार,अशोक धनगर ,किरण ओतारी व परिसरातील महिला यांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविलेला आहे .अभियानासाठी सर्व दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत
